शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:18 IST

1 / 8
5 जुलै रोजी जपानवर मोठे संकट येणार असल्याची भविष्यवाणी आधुनिक बाबा वेंगा समजल्या जाणाऱ्या जपानी महिला रियो तात्सुकी यांनी केली होती.
2 / 8
जपानमध्ये गेल्या महिनाभरात एका बेटावर ९०० हून अधिक भूकंप आले आहेत. यामुळे लोक दहशतीत होते.
3 / 8
मागील वेळच्या त्सुनामीची तात्सुकी यांनी भविष्यवाणी खरी ठरली होती, यामुळे जपान सरकारही या आपत्तीसाठी तयारी करत होते.
4 / 8
जपानमध्ये हा काळ पर्य़टनाचा असतो. जगभरातून लोक जपानला जात असतात. तात्सुकीच्या भविष्यवाणीने त्यांनी सर्व विमाने, हॉटेलची बुकिंग रद्द केली होती.
5 / 8
परंतू, तात्सुकीची भविष्यवाणी खरी ठरलीच नाही. ५ जुलैला जपानमध्ये काहीच घडले नाही. यामुळे जपान सरकारला सर्वाधिक हायसे वाटले आहे.
6 / 8
परंतू धोका अद्यापही टळलेला नाही, भूकंपाचे धक्के बसत आहेत. यामुळे येत्या काळात देखील मोठ्या आपत्तीचे संकट येऊ शकते, असे तिथे सांगितले जात आहे.
7 / 8
एका मंगा कॉमिकने ५ जुलै २०२५ रोजी मोठ्या आपत्तीची भाकीत केले होते. ते २०२१ मध्ये पुन्हा प्रकाशित झाले होते.
8 / 8
यामुळे या उन्हाळ्यात परदेशी पर्यटकांनी जपानकडे पाठ फिरविली होती. बुकिंग नसल्याने विमाने देखील रद्द करावी लागली होती.
टॅग्स :JapanजपानEarthquakeभूकंप