Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:47 IST
1 / 10Vladimir Putin High-Level Security : मागील काही वर्षापासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. दोन दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यासोबत अलास्कामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी चर्चा झाली. सध्या या दिग्गज नेत्यांच्या बैठकीची जोरदार चर्चा सुरू आहे.2 / 10अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या सुरक्षा एजन्सींनी मोठी तयारी केली होती. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सुरक्षेची मोठी चर्चा आहे. 3 / 10पुतिन यांच्याबद्दल आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अलास्काच्या दौऱ्यावर असलेले पुतिन यांनी त्यांच्यासोबत एक 'पूप सुटकेस' देखील आणली होती. ही सुटकेस त्यांच्या अंगरक्षकांच्या हातात होती, यामध्ये पुतिन यांची विष्ठा गोळा केली जात होती.4 / 10ही माहिती आपल्याला विचित्र वाटेल पण त्यामागे एक मोठे कारण आहे. मागील काही महिन्यांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजारी असल्याच्या बातम्या येत आहेत. 5 / 10अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर अलास्का येथील परिषदेच्यावेळी पुतिन यांचा अंगरक्षक अशी एक सूटकेस घेऊन बरोबर होती असे सांगितले जात आहे. ही सूटकेस बरोब ठेवण्याची पद्धत एक प्रकारे पुतिन यांच्या अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेची निशाणी बनली आहे. या सूटकेसचा उद्देश नेत्याच्या गोपनियतेचे संरक्षण करणे आणि विष्ठेच्या नमुन्यांमधून परकीय शक्तींना त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळू नये हा आहे.6 / 10रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी २००७ नंतर पहिल्यांदाच अमेरिकेला भेट दिली. यामुळे रशियन गुप्तचर संस्थांनी पुतिन यांच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली होती. पुतिन यांना सर्व बाजूंनी अंगरक्षकांनी वेढले होते. त्या अंगरक्षकांपैकी एकाने एक सुटकेसही बाळगल्याचे दिसून आले.7 / 10पॅरिस मॅच आणि यूएस एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पुतिन यांची विष्ठा गोळा करण्याचे काम रशियाच्या फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिस (FPS) च्या टीमकडून केले जाते. पुतिन यांच्या अंगरक्षकांकडे एक खास प्रकारची सुटकेस असते यामध्ये ते रशियन राष्ट्राध्यक्षांची विष्ठा आणि मूत्र गोळा करण्यासाठी खास पाकिट तयार केले आहे. नंतर ते पाकिट एका सूटकेसमध्ये ठेवले जाते. ते त्यांच्यासोबत रशियाला घेऊन जातात. 8 / 10२०१७ मध्ये ज्यावेळी पुतिन फ्रान्स दोऱ्यावर गेले होते त्यावेळीही त्यांनी पोर्टेबल टॉयलेटचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली.9 / 10रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पुतिन यांनी १९९९ पासून हे सुरू केले आहे. पण हे नेमके कोणत्या कारणासाठी केले जाते यावरुन प्रश्न उपस्थित होतात. पुतिन यांना काही गंभीर आजार असल्याचे बोलले जाते.10 / 10रशियन राष्ट्रपती भवनाने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पण, एक्सप्रेस यूएसच्या अहवालानुसार, पुतिन पार्किन्सनसारख्या गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराने ग्रस्त आहेत. या कारणमुळेचे ते कोणत्याही देशात त्यांची विष्ठा आणि मूत्र देखील सोडत नाहीत.