शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 1:04 PM

1 / 12
कोरोनामुळे अवघे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना रशियाने जगाला हादरविले आहे. रशियाने आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब चाचणीचा व्हिडीओ जारी केला असून हे टॉप सिक्रेट जगासमोर आले आहे.
2 / 12
ईवान नावाचा हा अणुबॉम्ब आहे. हा एवढा विनाशकारी आहे की, हिरोशिमावर अमेरिकेने टाकलेला अणुबॉम्ब काहीच नाहीय. हिरोशिमापेक्षा 3333 पटींनी घातक आहे. महत्वाचे म्हणजे ही चाचणी आताची नाही तर 1961 मध्ये करण्यात आली होती.
3 / 12
अमेरिकेला टक्कर देण्यासाठी शीतयुद्धावेळी रशियाने केवळ 7 वर्षांत हा अणुबॉम्ब बनविला होता. या जा बांबा (Tsar Bomba) डिव्हाईसचे 30 ऑक्टोबर 1961 मध्ये बॅरंट सागरात परीक्षण करण्यात आले.
4 / 12
रशियाच्या या अणुबॉम्बची ताकद 50 मेगाटन आहे. म्हणजेच 5 कोटी टन परंपरागत स्फोटकांच्या एवढी. हा अणुबॉम्ब रशियाने विमानातून आर्टिक समुद्रातील नोवाया जेमल्यावरील मोठ्या बर्फावर टाकला होता. जेव्हा या अणुबॉम्बबाबत पश्चिमेकडील देशांना सुगावा लागला तेव्हा या बॉम्बचे नाव 'Tsar Bomba' ठेवण्यात आले.
5 / 12
रशियाची रोस्तम स्टेट अॅटोमिक एनर्जी कॉर्पोरेशनने आपल्या युट्यूब चॅनेलवर 30 मिनिटांची डॉक्युमेंट्री अपलोड केली आहे.
6 / 12
या महाविनाशक अणुब़ॉम्बची धास्ती एवढी होती की याचा विस्फोट रेकॉर्ड करण्यासाठी जे कॅमेरे लावण्यात आले होते ते शेकडो मैलांवर होते. तसेच लो लाईट पोझिशनवर होते.
7 / 12
या कॅमेरांनी 40 सेकंदांचा या आगीच्या अजस्त्र गोळ्याचा व्हिडीओ कैद केला आहे. हे कॅमेरे लावलेले विमान 100 मैल अंतरावर होते.
8 / 12
अणुबॉम्ब फुटल्यानंतर त्याचे जे धुराचे लोळ उठले ते तब्बल 213000 फूट उंचावर गेले होते. या चाचणीचा व्हिडीओ रशियाने 6 दशके टॉप सिक्रेट म्हणून ठेवला होता. आता रोस्तमला 75 वर्षे पूर्णझाल्याच्या निमित्ताने जगाला ताकद दाखविण्यासाठी जारी करण्यात आला आहे.
9 / 12
रशियन सैन्याने या अणुबॉम्बला RDS-220 नाव दिले होते. हा जगातील सर्वात मोठा अणुबॉम्ब आहे. सोव्हएत संघाने अमेरिकेच्या थर्मोन्‍यूक्लियर डिवाइसला टक्कर देण्यासाठी हा बॉम्ब बनविला होता. 1954मध्ये अमेरिकेने थर्मोन्‍यूक्लियर बॉम्बची चाचणी घेतली होती. मात्र, त्याची शक्ती ही 15 मेगाटन होती. तेव्हा तो सर्वात शक्तीशाली होता.
10 / 12
रशियाने हा अणुबॉम्ब रेल्वेने ओलेन्‍या एयरबेसवर नेला. त्य़ानंतर तो एका लांब पल्ल्याचा मारा करू शकणाऱ्या Tu-95 बॉम्बर विमानाला जोडण्यात आला. या विमानाने 600 मैलाचा प्रवास करून आर्टिक समुद्रात हा अणुबॉम्ब फेकला होता.
11 / 12
अणुबॉम्बला पॅरॅशूट जोडल्याने तो एवढा धीम्यागतीने बर्फावर आदळला की तोपर्यंत बॉम्बर विमान अणुबॉम्बच्य़ा कक्षेतून बाहेर प़डले होते. जवळपास 13000 फूट उंचीवरून टाकण्यात आला.
12 / 12
अणुबॉम्बला पॅरॅशूट जोडल्याने तो एवढा धीम्यागतीने बर्फावर आदळला की तोपर्यंत बॉम्बर विमान अणुबॉम्बच्य़ा कक्षेतून बाहेर प़डले होते. जवळपास 13000 फूट उंचीवरून टाकण्यात आला.
टॅग्स :russiaरशियाnuclear warअणुयुद्धAmericaअमेरिका