Ukraine Russia War: 'Miss Ukrain नेही घेतलं शस्त्र हाती, देशाच्या लढाईत पुढे सरसावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 20:16 IST
1 / 10रशियाने युक्रेनवर कब्जा केल्यानंतर आता मागे न हटण्याचा निर्धार करत युक्रेनचे राष्ट्रपतीही युद्धाला सामोरे जात मैदानात उतरले आहेत. त्यानंतर, आता तेथील महिलांनीही देश वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2 / 10युक्रेनमधील प्रसिद्ध व्यक्ती आणि महिलांही हाी बंदुक घेऊन युद्धाच्या मैदानात उतरल्या आहेत. येथील माजी मिस युक्रेन अनस्तसिया लेन्नानेही बंदुक हाती घेतली आहे. 3 / 10सन 2015 मध्ये मिस युक्रेनचा खिताब जिंकणाऱ्या अनस्तसिया लेन्नाच्या हातात बंदुक असलेला एक फोटो समोर आला आहे. लेन्ना ही रशियापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सैन्यात दाखल झाली आहे. 4 / 10लेन्नाने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. आपण, आपल्या घराच्या संरक्षणासाठी हे बंदुक हाती घेतल्याचं तिनं म्हटलं आहे. 5 / 10कब्जा मिळविण्याच्या हेतुने जो कोणी युक्रेन सीमारेषेच्या आत येईल, तो ठार मारला जाईल, असे कॅप्शनही लेन्नाने या फोटोला दिले आहे. तसेच, लेन्नाने नाटोला टोलाही लगावला आहे. 6 / 10युक्रेनचं सैन्य सध्या ज्या गतीने लढत आहे ते पाहता, नाटोनेच युक्रेनमध्ये सहभागी व्हायला हवे, असे मजेशीर कॅप्शनही तिने दिले आहे. 7 / 10युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांना प्रामाणिक शक्तीशाली नेता असे संबोधत त्यांचा सैनिकांसमवेत चालत असतानाचा फोटोही शेअर केला आहे. 8 / 10 अनास्तासियाचे इंस्टाग्राम पर 75,000 फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडिया वर सातत्याने एक्टिव असते. त्यामुळेच, तिचा हा फोटो काही तासांतच जगभर व्हायरल झाला आहे. 9 / 10रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धग सातत्याने वाढताना दिसत आहे. आज युद्धाचा चौथा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये तुर्तासतरी तोडगा निघेल, असे वाटत नाही. 10 / 10राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन माजी युक्रेन सुंदरीचा फोटो शेअर केला आहे. युक्रेन लष्करात महिलांची संख्या लक्षणीय आहे, असेही त्यांनी म्हटलंय.