शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशात आहे ‘नरकाचा दरवाजा’! राष्ट्रपतींनी दिला बंद करण्याचा आदेश; येथे 51 वर्षांपासून का धगधगतेय आग?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 5:13 PM

1 / 9
सोव्हिएत युनियनचा भाग असलेला मध्यआशियातील देश तुर्कमेनिस्तानच्या उत्तरेला एक मोठा खड्डा आहे. याला 'गेट्स ऑफ हेल' (Gates of Hell) असे म्हटले जाते. यासंदर्भात बोलताना, आपण हा दरवाजा बंद करण्याचे ठरवले असल्याचे तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुरबांगुली बर्दीमुहामेदोव (Gurbanguly Berdimuhamedov) यांनी म्हटले आहे.
2 / 9
व्यवसायाने डेंटिस्ट राहिलेल्या राष्ट्रपतींनी आपल्या मंत्र्यांना, जवळपास अर्ध्या शतकापासून आगीने धगधगत असलेला हा खड्डा बुजवू शकतील, अशा तज्ज्ञ मंडळींचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. हा खड्डा येथे 1971 पासून आहे, तो आधी नव्हता. म्हणजेच येथे तब्बल 51 वर्षांपासून आग धगधगत आहे.
3 / 9
दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांची आर्थिक स्थिती खराब झाली होती. यानंतर सोव्हिएत युनियनचे भूगर्भशास्त्रज्ञ कच्च्या तेलाचे साठे शोधण्यासाठी काराकुमच्या वाळवंटात गेले. यात त्यांना यशही आहे. त्यांना येथे सर्वत्र नैसर्गिक वायूचे साठेही मिळाले. मात्र, या शोधादरम्यान जमीन धसली आणि तीन मोठे खड्डे तयार झाले.
4 / 9
या खड्ड्यातून मिथेन वायू बाहेर येण्याचा धोका होता. तो वातावरणात पसरू नये म्हणून, वैज्ञानिकांनी त्याला आग लावली. गॅस संपल्यानंतर ही आग आपोआप विझेल असे वाटले. पण तसे होऊ शकले नाही आणि तेव्हापासून या खड्ड्यात आग आहे. ही कहाणी किती खरी आहे याचा कोणताही पुरावा नाही.
5 / 9
या 230 फूट रुंद असलेल्या भयंकर खड्ड्यात अजूनही आग धगधगत आहे. ही आग अनेक मैलांवरूनही दिसू शकते. 'नरकाचा दरवाजा' व्यतिरिक्त या खड्ड्याला 'नरकाचे तोंड'ही म्हटले जाते. हे ठिकाण देशाची राजधानी अश्गाबातपासून 160 मैल उत्तरेला आहे.
6 / 9
मानवी हक्कांचे उल्लंघन आणि विरोधकांना चिरडत असल्याच्या आरोपांचा सामना करत असलेल्या बर्डीमुहामेडोव्ह यांनी अधिकाऱ्यांना सातत्याने या आगीमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान रोखण्याचे आदेश दिले आहेत. याच वेळी त्यांनी, अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या आगीमुळे लोकांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत असल्याचेही सांगितले.
7 / 9
हा नरकाचा दरवाजा पर्यटकांसाठी आकर्षनाचे एक केंद्र बनला आहे. जगभरातील लोक हा खड्डा पाहण्यासाठी येत असतात. महत्वाचे म्हणजे हा खड्ड बंद करण्यात यश येते की नाही, हे वेळच ठरवू शकेल.
8 / 9
वर सांगितल्या गेलेल्या कथेनुसार, तुर्कमेनिस्तानातील भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की हा भला मोठा खड्डा 1960 च्या दशकांपासून आहे. मात्र, यात 1980 च्या दशकापासून आग आलगली आहे.
9 / 9
Gates of hell...
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेfireआग