धक्कादायक! ‘टायटन’ पाणबुडीचा स्फोट झाला? Titan मधील मृतांचे अवशेष सापडले,सहा दिवसांनी बाहेर काढली पाणबुडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 05:11 PM2023-06-29T17:11:37+5:302023-06-29T17:26:00+5:30

१८ जून रोजी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघालेल्या टायटन या पाणबुडीचे अवशेष समुद्रात १२,५०० फूट खोलवर सापडले होते.

गेल्या काही दिवसापूर्वी समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघालेल्या टायटन पाणबुडीतील सर्व ५ जणांचा मृत्यू झाला होता. या पणबुडीमध्ये मोठ्या दाबामुळे टायटनचा स्फोट झाला यात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

१८ जून रोजी प्रवासाला निघालेल्या पाणबुडीचे अवशेष समुद्रात १२,५०० फूट खोलवर सापडले होते.

पाणबुडीचे तुकडे शोधून समुद्रकिनाऱ्यावर आणले जात आहेत. कॅनडाच्या सेंट जॉन बंदरावर होरायझन आर्क्टिक जहाजातून हे अवशेष आणण्यात आले आहेत. १८ जून रोजी ओशनगेट कंपनीच्या या पाणबुडीचा प्रवास सुरू झाला होता, मात्र पहिल्या दोन तासांतच या पाणबुडीशी संपर्क तुटला.

पाणबुडीत बसलेले पाचही जण सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश, प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि समुद्रशास्त्रज्ञ पॉल-हेन्री नार्गिओलेट यांचा समावेश होता.

पाणबुडीत बसलेले पाचही जण सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश, प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि समुद्रशास्त्रज्ञ पॉल-हेन्री नार्गिओलेट यांचा समावेश होता.

अहवालानुसार, टायटन पाणबुडीचे अवशेष समुद्रात सुमारे १२,५०० फूट खोलवर सापडले आहेत. हा ढिगारा टायटॅनिकच्या अवशेषापासून सुमारे १६०० फूट अंतरावर होता.

शोध मोहिमेचे नेतृत्व करत असलेल्या यूएस कोस्ट गार्डने म्हटले आहे की, उत्तर अटलांटिकच्या अतिदुर्गम भागात अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आणि युनायटेड किंगडमच्या तपास यंत्रणांनी सुरू असलेल्या शोधात हे अवशेष सापडले आहेत.

यूएस कोस्ट गार्डचे मुख्य अन्वेषक कॅप्टन जेसन न्यूबाऊर यांनी सांगितले की, अपघातस्थळाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. मात्र, या तपासासाठी त्यांनी अंतिम मुदत दिलेली नाही. ते म्हणाले की, अंतिम अहवाल आंतरराष्ट्रीय सागरी संघटना जारी करेल. "जगभरातील सागरी क्षेत्राची सुरक्षा सुधारण्यासाठी आवश्यक शिफारशी करणे हे माझे पहिले ध्येय आहे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल."

कॅनडाच्या होरायझन आर्क्टिक या जहाजाच्या मदतीने टायटन पाणबुडीचे अवशेष शोधण्यात आले आहेत. होरायझन जहाजाने पाणबुडीचे तुकडे शोधण्यासाठी आरओव्ही नेले. ही आरओव्ही पेलाजिक रिसर्च सर्व्हिसेस कंपनीची आहे. कंपनीचे प्रवक्ते जेफ महोनी यांनी सांगितले आहे की, शारीरिक आणि मानसिक आव्हाने असतानाही आम्ही या ऑपरेशनमध्ये दहा दिवस दिवसाचे 24 तास काम करत आहोत.