1 / 8ऋषी सुनक यांच्या पक्षाचा मोठ्या प्रमाणात पराभव झाल्याने लेबर पार्टीचे नेतृत्व करत असलेले केयर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होऊ शकतीत, असे म्हटले जात आहे.2 / 8दुसरीकडे, पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशिवाय भारतीय वंशाच्या अनेक ब्रिटिश नागरिकांनी सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे.3 / 8यावेळी ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या गेल्या वेळेपेक्षा जास्त असू शकते. या सार्वत्रिक निवडणुकीत ६८० जागांपैकी १०७ ठिकाणी ब्रिटिश-भारतीय उमेदवार रिंगणात होते.4 / 8ऋषी सुनक सध्याचे पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी उत्तर इंग्लंडची जागा जिंकली. गतवेळच्या तुलनेत त्यांना कमी मते मिळाली असली तरी त्यांनी आपला विजय कायम राखला.5 / 8शिवानी राजा कंझर्वेटिव्ह पक्षाच्या नेत्या शिवानी राजा यांनी लीसेस्टर पूर्वमधून विजय मिळवला.शिवानी राजा या माजी खासदार क्लॉड वेब आणि किथ वाझ यांसारख्या दिग्गजांच्या विरोधात उभ्या होत्या ज्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. शिवानी राजा यांचा जन्म लीसेस्टरमध्ये झाला आणि त्यांनी हेरिक प्राइमरी, सोर व्हॅली कॉलेज, वायगेस्टन आणि क्वीन एलिझाबेथ II कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.6 / 8कनिष्क नारायण मजूर पक्षाचे नेते कनिष्क नारायण हे वेल्समधून निवडणूक जिंकणारे अल्पसंख्याक पार्श्वभूमीचे पहिले खासदार ठरले आहेत. नारायण यांनी वेल्शचे माजी सचिव अलुन केर्न्स यांचा पराभव केला आहे. त्यांचा जन्म भारतात झाला आणि वयाच्या १२व्या वर्षी ते कार्डिफला गेले.7 / 8सुएला ब्रेव्हरमन कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या सुएला ब्रेव्हरमन यांनी फरेहम आणि वॉटरलूविल या जागेवर विजय मिळवला आहे. ऋषी सुनक सरकारमध्ये त्या मंत्री होत्या पण त्यांना पदावरून हटवण्यात आले. पंतप्रधान सुनक यांना आव्हान दिल्यानंतर त्यांना गृहसचिव पदावरूनही हटवण्यात आले होते.8 / 8प्रीत कौर गिल लेबर पार्टीच्या उमेदवार प्रीत कौर गिल यांनी बर्मिंगहॅम एजबॅस्टन मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांच्यासमोर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार अश्वीर संघा होते.