‘या’ 15 गोष्टींमुळे मानवी जीवन झालं अधिक सुखकर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 5:10 PM
1 / 16 मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज मानवी जीवन सुखकर आणि सुसह्य झालं आहे. पाटा-वरवंट्याची जागा आता मिक्सरने घेतलीये आणि नदी-विहिरींवर कपडे धुण्याऐवजी वॉशिंग मशीन आल्या आहेत. अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यांच्यामुळे आपलं जगणं सोपं झालंय. पाहूया अशा काही वस्तू ज्यांनी आपलं जीवन आणखी सुखकर केलं. 2 / 16 पॅन्टच्या या पट्ट्याला बटण नसल्यानं ते सतत पोटात खुपून त्याचा त्रास होत नाही. 3 / 16 फुलपाखरासारखे कि-बोर्ड ज्याने तुमच्या हाताला आराम मिळतो. 4 / 16 आत किती पैसे ठेवलेत याचा हिशेब ठेवणारा हा स्मार्ट गल्ला. 5 / 16 एकाच रुममधल्या एका व्यक्तीला पुस्तक वाचण्यासाठी तर दुसऱ्याला झोप लागावी म्हणून बनवलेला लॅम्प 6 / 16 हा दुमडणारा चष्मा तुमच्या बॅगमधील जास्त जागा व्यापत नाही. 7 / 16 बाथरुममध्ये गरमीने या आरश्यावर बाष्प जमा होत नाही आणि आपला चेहरा स्पष्ट दिसतो. 8 / 16 हा शॉवर अंग भाजेल इतकं पाणी गरम होऊ देत नाही 9 / 16 हातातील पर्समध्येही राहू शकेल अशी लहान उपयोगी इस्त्री. 10 / 16 हे मेमरी कार्डएवढं पोर्टेबल चार्जर कामात मात्र आहे चोख. 11 / 16 बेड हा फक्त झोपण्यासाठी नसतो हे दाखवणारा हा बेड कम वर्क प्लेस. 12 / 16 ही फोन सांभाळणारी वस्तू आपल्यासारख्या तरूणाईसाठी फार उपयोगाची. 13 / 16 सूर्यप्रकाशामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घेणारे पडदे. 14 / 16 हे लाईट बॉल्स तुम्ही प्रवासादरम्यानही कुठेही घेऊन जाऊ शकता. 15 / 16 हा स्मार्ट बेड तुमच्या शरीरानुसार स्वत:ला अॅडजस्ट करतो आणि सकाळी तुम्हाला झोपेतून उठायलाही मदत करतो 16 / 16 या ट्यूबमधून दोन्ही बाजूंनी टूथपेस्ट निघत असल्याने तुमचे पैसे वाया जात नाहीत. आणखी वाचा