शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळावर राहू शकतात पृथ्वीवरचे हे चार जीव, तज्ज्ञांचा मोठा दावा

By बाळकृष्ण परब | Published: November 25, 2020 1:49 PM

1 / 6
पृथ्वीच्या जवळच्या शेजाऱ्यांपैकी एक असलेल्या मंगळ ग्रहाबाबत मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. दरम्यान, पृथ्वीवरील रहिवाशांन लवकरच राहण्यासाठी मंगळाचा आसरा मिळू शकतो. पृथ्वीवरील काही जीव मंगळ ग्रहावरील वातावरणाशी जुळवून घेत वास्तव्य करू शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
2 / 6
जगभरातील तज्ज्ञांच्या मते मंगळग्रहावर कोट्यवधी वर्षांपूर्वी जीवन असावे. त्याबाबतचे काही पुरावेही मिळाले आहेत. नासाच्या मार्स क्युरियॉसिटी रोव्हरने मंगळ ग्रहावर पूर येऊन गेल्याचे तसेच तिथे सुक्ष्म जीव असल्याचे पुरावे शोधले आहेत.
3 / 6
मंगळ ग्रहावर पृथ्वीवरील कुठले जीव राहू शकतात. याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ अरकन्सासच्या सेंटर फॉर स्पेस अँड प्लॅनेटरी सायन्सेसच्या संशोधकांनी सांगितले की, पृथ्वीवरील चार प्रजातींचे जीव मंगळ ग्रहावर राहू शकतात.
4 / 6
मंगळ ग्रह हा रहिवासासाठी अत्यंत प्रतिकूल ग्रह आहे. येथील वातावरण विरळ आहे. तसेच येथील हवामान असुरक्षित आणि वेगाने बदलणारे आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीवर राहणाऱ्या जिवांसाठी तिथे राहणे कठीण आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या चार प्रजातींच्या मायक्रो-ऑर्गेनिज्म म्हणजे सुक्ष्म जीव तिथे राहण्यास सक्षम आहे.
5 / 6
जे चार सुक्ष्मजीव मंगळावर राहू शकतात त्यांच्यामध्ये मिय़ेनोथर्मोबॅक्टर वोल्फी, मिथेनोसार्सिना बार्केरी, मिथेनोबॅक्टेरियम फॉर्मिसिकम आणि मिथेनोकोकस मारिपालुडिस यांचा समावेश आहे. हे सुक्ष्मजीव ऑक्सिजनशिवाय राहू शकतात. या सुक्ष्मजीवांवर कमी दबाव आणि रेडिएशनचा परिणाम होत नाही. या जीवांना मिथेनोजेन्स या नावाने ओळखले जाते.
6 / 6
मिथेनोजेन्स ओलसर जागी, समुद्रामध्ये आणि प्राण्यांच्या पचननलिकेत आढळून येतात. हे जीव हायड्रोजन आणि कार्बनडाय ऑक्साइडचे सेवन करतात आणि मल म्हणून मिथेन गॅस सोडतात. मंगळग्रहावर वायुमंडळावर मिथेन गॅस मोठ्या प्रमाणात असल्याचे नासाच्या अनेक मोहिमेतून ही बाब सिद्ध झाली आहे.
टॅग्स :Marsमंगळ ग्रहscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय