ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 19:22 IST
1 / 7आधीच तणावपूर्णं संबंध असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये कधीही युद्धाला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांकडे असलेली लष्करी ताकद, अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आदींचा आढावा घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण पाकिस्तानी सैन्यासाठी पंचप्राण असेल्या पाकिस्तानमधील पाच ठिकाणांचा आढावा घेऊयात जिथे पाकिस्तानने शस्त्रसामुग्रीचा साठा करून ठेवलेला आहे, 2 / 7एका रिपोर्टनुसार पाकिस्तानने अण्वस्त्रं वाहून नेण्यासाठी सक्षम असलेल्या क्षेपणास्त्रांची देशामध्ये पाच ठिकाणी केंद्र स्थापित केलेली आहेत. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत भारताने जर या पाच ठिकाणांवर हल्ला केला. तर पाकिस्तानचे कंबरडे मोडेल. तसेच पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रांचा वापर करू शकणार नाही. पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली ही पाच ठिकाणं पुढील प्रमाणे आहेत. 3 / 7पाकिस्ताननं क्षेपणास्त्रांचा साठा ठेवलेलं हे ठिकाण बलुचिस्तानमधील सक्कर येथून सुमारे २२० किमी दूर पश्चिमेला आहे. येथे अण्वस्त्रं ठेवण्यासाठी जमिनीखाली खास गोदाम बांघलेलं आहे. भारताच्या सीमेपासून हे केंद्र फार दूर अंतरावर आहे. 4 / 7पाकिस्तानचा क्षेपणास्त्रांचा साठा असलेलं हे केंद्र सिंध प्रांतामध्ये आहे. हे केंद्र बाबर आणि शाहीनसारख्या क्षेपणास्त्रांसाठी खासकरून बांधण्यात आलेलं आहे. हे केंद्र भारतापासून केवळ ६० किमी अंतरावर आहे. 5 / 7सरगोधा येथे पाकिस्तानने दहापेक्षा अधिक भूमिगत बंकर उभारलेले आहेत. त्याच्या जवळच सगरोधा वेपन्स स्टोरेज कॉम्प्लेक्स आहे. तिथे अण्वस्त्रे ठेवण्यात येतात. 6 / 7गुजरांवाला येथे पाकिस्तानचा एक लष्करी तळ आहे. हे पाकिस्तानचं सर्वात मोठं लष्करी केंद्र आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील उत्तर पूर्व भागामध्ये ते सुमारे ३० चौरस किमी परिसरात पसरलेलं आहे. हा तळ भारताच्या सीमेपासून ६० किमी दूर अंतरावर आहे. 7 / 7हा भाग सिंध प्रांतामधील हैदराबाद येथून १८ किमी दूर उत्तरेत आहे. येथे क्षेपणास्त्रं दुरुस्ती केंद्र आहे. १२ लॉन्चर्ससाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे केंद्र भारताच्या सीमेपासून १४५ किमी अंतरावर आहे.