By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 09:53 IST
1 / 6अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजची समुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अथवा शांतता करारासाठी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. एवढेच नाही तर, असे न झाल्यास इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याची धमकीही दिली आहे. मात्र इराणने ट्रम्प यांची धमकी थेट धुडकावून लावली आहे.2 / 6इराणच्या सेंट्रल मिलिट्री कमांडने ट्रम्प यांची ४८ तासांची धमकी धुडकावून लावली. महत्वाचे म्हणजे, इराणने ट्रम्प यांची धमकी केवळ धुडकावलीच नाही, तर असे झाल्यास अमेरिकेसाठी 'नरकाचे दरवाजे खुले होतील' अशी थेट प्रतिधमकीही दिली आहे.3 / 6खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयातून जारी केलेल्या निवेदनात इराणी लष्करी जनरल अली अब्दुल्लाही अलीबादी म्हणाले, ट्रम्प यांची धमकी म्हणजे, 'एक असहाय्य, घाबरलेले, असंतुलित आणि मूर्खपणाचे कृत्य आहे.' तसेच, 'या संदेशाचा सरळ अर्थ म्हणजे, तुमच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडले जातील.'4 / 6तत्पूर्वी, नुकताच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वरून एका धमकीवजा पोस्टमध्ये इराणला इशारा दिला. यात होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला, 'लक्षात असू द्या, जेव्हा मी इराणला करार करण्यासाठी किंवा होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली होती? आता वेळ निघून जात आहे. केवळ ४८ तासच शिल्लक आहेत.5 / 6दुसरीकडे, इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या बुशहर अणुऊर्जा केंद्रावर चौथ्यांदा मोठा हमला केला. यानंतर, इराणने पहिल्यांदाच अणुयुद्धाचा धोका बोलून दाखवला आहे. 6 / 6इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, या हल्ल्यांमुळे जर किरणोत्सर्गाचा प्रसार (Radioactive Fallout) झाला, तर त्याचा फटका केवळ तेहरानला बसणार नाही. उलट सौदी अरब, यूएई, कुवैत, बहरीन, कतर आणि ओमान सारख्या जीसीसी (GCC) देशांमधील जीवन पूर्णपणे नष्ट होईल. इराणच्या या दाव्याने संपूर्ण आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे.