1 / 9गेल्या महिन्यात इस्रायल इराण युद्ध सुरु झाले आणि अमेरिकेच्या इराणवरील अणुस्थळांच्या हल्ल्याने संपले. इराणच्या अणुकार्यक्रमाला उध्वस्त करण्यात आल्याचा दावा अमेरिका आणि इस्रायल करत आहेत. अमेरिकेने सात बी २ बॉम्बर विमानांनी १४ बंकर बस्टर बॉम्ब टाकले होते. या बी२ बॉम्बर विमानाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. 2 / 9इराणवर हल्ला करण्यासाठी गेलेले सातपैकी एक बी -२ बॉम्बर विमान अद्याप त्याच्या बेसवर परतलेले नाहीय. यामुळे या विमानाबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही यावर काही स्पष्टीकरण दिलेले नाही. 3 / 9पेंटागॉननुसार इराणची तीन अणुस्थळे उध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन मिडनाइट हॅमर राबविण्यात आले होते. त्यासाठी पाठविलेले बी-२ बॉ़म्बर विमाने पुन्हा मूळ बेसवर परतली आहेत. ही विमाने मिसौरीच्या व्हाईटमॅन एअर फोर्स बेसवर उतरली आहेत. 4 / 9परंतू, आता असे समोर येत आहे की सातपैकी सहाच विमाने तिथे उतरली आहेत. तर एक विमान तिथे पोहोचलेलेच नाहीय. २१ जूनला मिसौरीहून बी-2 स्पिरिट बॉम्बर्स विमानांनी दोन टप्प्यांत उड्डाण केले होते. 5 / 9तेव्हाच्या वृत्तानुसार सहा विमाने होती जी पश्चिमेकडे निघाली होती. गुआममधील अमेरिकेच्या असलेल्या एअरबेसकडे ती निघाली होती. तर सात बी २ बॉम्बर विमाने इराणकडे पूर्वेकडे जात होती. 6 / 9ही विमाने एकावेळी दोन बंकर बस्टर बॉम्ब घेऊन जातात. त्यानुसार १४ बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यातही आले. यानंतर ही विमाने पुन्हा माघारीही फिरली होती. 7 / 9यूरेशियन टाइम्सच्या माहितीनुसार बी-2 विमानांच्या पहिल्या गटाची जास्त माहिती उपलब्ध नाही. ती कदाचित इराणला गाफिल ठेवण्यासाठी पश्चिमेकडे पाठविण्यात आली असावीत. 8 / 9या गटातील किमान एका बी-२ ने होनोलुलुमधील डॅनियल के. इनौये आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केल्याचे समोर येत आहे. हवाईमधील हिकम एअर फोर्स बेसजवळ हा विमानतळ आहे. 9 / 9हे बॉम्बर विमान अद्यापही या विमानतळावर अडकलेले आहे. इराणवरील हल्ल्यावेळी इराणने एक अमेरिकन विमान पाडल्याचा दावा केला होता. परंतू तो अमेरिकेने फेटाळला होता. या मोहिमेत एकूण १२८ लढाऊ विमाने वापरण्यात आली होती.