By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 23:14 IST
1 / 5तुम्हाला असा देश माहीत आहे का ज्याची लोकसंख्या फक्त 27 आहे. जर तुम्हाला माहीत नसल्यास सांगू इच्छितो की, इंग्लंडच्या समुद्रकिना-यालगत सीलँड हा देश आहे. 2 / 5इंग्लंडच्या सफोल्ड या समुद्रकिना-यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीलंड किल्ल्यावर हा देश वसला आहे. दुस-या महायुद्धात इंग्लंडनं या देशाची निर्मिती केली होती.3 / 5सीलँडवर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी राज्य केलं आहे. 9 ऑक्टोबर 2012ला रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीला सीलँडचा राजा घोषित करण्यात आलं होतं. 4 / 5रॉय यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा मायकल यांनी राज्य केलं. ज्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नसते त्यांना छोटे देश म्हणून संबोधण्यात येते. 5 / 5 सीलँड या देशाचे क्षेत्रफळ 250 मीटर (0.25 किलोमीटर) एवढी आहे. भकास अवस्थेत असलेल्या या किल्ल्याला सीलँडसोबत रफ फोर्ट म्हणूनही ओळखले जाते.