शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! कोरोना लसीकरण बेतलं जीवावर; ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर 'या' देशात दोघांचा मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 11:19 AM

1 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू असून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. तसेच खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
3 / 14
कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. लसीकरणाची मोहीम सुरू असतानाच दक्षिण कोरियातून धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. एस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
4 / 14
योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी सेऊलच्या उत्तर-पश्चिम सीमेजवळील गोयांग रुग्णालयात मंगळवारी सकाळी 50 रुग्णांना कोरोना लस देण्यात आली होती. मृत्यू झालेला रुग्ण याच 50 जणांपैकी एक होता.
5 / 14
कोरोना लस घेतल्यानंतर दुपारी या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यावेळी त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
6 / 14
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे झाला का, याचा तपास करण्यात येत आहे. या रुग्णाला मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार होते. तर, दुसऱ्या एकाचा मृत्यूही करोनाची लस घेतल्यानंतर झाला आहे.
7 / 14
एस्ट्राजेनका कंपनीने यावर कोणतेही भाष्य केले नाही. तर, डेली मेलने नवीन निष्कर्षांचा हवाला देत ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची जोखीम 90 टक्के कमी होत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 14
इस्रायलमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला आपल्या बाळाला गमवावं लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोरोनामुळेच बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
9 / 14
मिळालेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला इस्रायलच्या मीर मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. महिलेला दोन दिवस ताप येत होता आणि तिच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणं आढळली होती.
10 / 14
इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 'ही एक दुर्मिळ घटना आहे आणि इस्रायलमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रकरण समोर आलं आहे' अशी माहिती दिली. मीर मेडिकल सेंटरचे डॉक्टर ब्रोश यांनी वाईनेट वेबसाइटशी संवाद साधताना कोरोना व्हायरसमुळेच बाळाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे असं म्हटलं आहे.
11 / 14
संशोधनातून कोरोना लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.
12 / 14
संशोधनातून कोरोना लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.
13 / 14
रिपोर्टनुसार, कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींचे इतर आजारही बरे झाले आहेत. आरोग्यासंबंधित समस्यांना नियंत्रित करण्यातही कोरोना लस प्रभावी ठरत असल्याचं दिसून आता नव्या रिसर्चमधून दिसून आलं आहे.
14 / 14
फक्त कोरोना लसच नाही तर याआधीदेखील काही लशींनी अशीच कमाल केली होती. काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट समोर येत असताना या माहितीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसSouth Koreaदक्षिण कोरियाDeathमृत्यू