शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 19:15 IST

1 / 7
भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे चांगलेच चर्चेत आहेत. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सैन्यदलाने तुफानी कारवाई करत दहशतवादी अड्ड्यांसह पाकिस्तानच्या हवाई तळांची धुळधाण उडवल्याने शाहबाज शरीफ यांची चांगलीच नाचक्की झालेली आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील धनाढ्य उद्योजक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्य असलेल्या शाहबाज शरीफ यांचं वैवाहिक जीवनही कमालीचं वादग्रस्त आहे.
2 / 7
शाहबाज शरीफ यांची एकूण पाच लग्न झाली असून, त्यांनी पहिलं लग्न चुलत बहिणीशी केलं होतं. तर पुढे त्यांनी एका पत्नीसाठी प्रेमाचं प्रतीक म्हणून एक उड्डाणपूलसुद्धा बांधलं होतं. या पुलाला आता हनी ब्रिज म्हणून ओळखतात.
3 / 7
शाहबाज शरीफ यांचं पहिलं लग्न ते २२ वर्षांचे असताना १९७३ मध्ये त्यांची चुलत बहीण नुसरत बट हिच्यासोबत झालं होतं. त्यांना दोन मुलगे आणि दोन जुळ्या मुली अशी चार मुलं आहेत. दरम्यान, नुसरत बट ह्या आता वेगळ्या राहतात. त्यांचा आणि शाहबाज यांचा १९९३ साली तलाक झाल्याचे सांगण्यात येते.
4 / 7
शाहबाज शरीफ यांचं दुसरं लग्न १९९३ साली मॉडेल आलिया हनी हिच्यासोबत झालं होतं. हे लग्न शाहबाज शरीफ यांचे वडील मियां शरीफ यांना मान्य नव्हतं. त्यावेळी शाहबाज ४३ वर्षांचे होते. तर आलिया ह्या उगवत्या मॉडेल होत्या. दोघांनीही गुपचूप लग्न उरकलं होतं. एवढंच नाही तर पत्नीला घरी यायला उशीर होऊ नये म्हणून शाहबाज शरीफ यांना एक उड्डाणपूलदेखील बांधलं होतं. दरम्यान, १९९९ साली पाकिस्तानमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर जेव्हा शाहबाज शरीफ आणि आलिया हनी यांना निर्वासित होऊन सौदी अरेबियात जावं लागलं होतं. त्यानंतर आलिया हनी यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता.
5 / 7
१९९३ साली शाहबाज शरीफ यांनी कथितपणे पाकिस्तानच्या केंद्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक तारिक खोसा यांची बहीण नरगिस खोसा हिच्यासोबत विवाह केला होता. मात्र शरीफ कुटुंबाने हा विवाह अमान्य केला होता. पुढे हे लग्न गोपनीय पद्धतीने समाप्त करण्यात आले.
6 / 7
शाहबाज शरीफ यांचं चौथं लग्न २००३ साली तहमीना दुर्रानी हिच्यासोबत झालं होतं. हा विवाहदेखील गोपनीय पद्धतीने झाला होता. त्यामुळे अनेक लोक आश्चर्यचकीत झाले होते. शाहबाज यांचं हे नातं सुमारे आठ वर्षं चाललं. मात्र त्याबाबत बराच काळ गोपनीयता बाळगण्यात आली होती.
7 / 7
शाहबाज शरीफ यांचं पाचवं लग्न २०१२ साली कुलसूम नामक एका सरकारी अधिकाऱ्यासोबत झालं होतं. मात्र लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतरही मागच्या अनेक वर्षांपासून शाहबाज शरीफ यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत अनेक अफवा आणि चर्चा वारंवार समोर येत असतात.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय