शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लष्करावर टीका केल्यानं पंतप्रधानांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; लोकांना भडकवण्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 3:29 PM

1 / 10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम नवाज आणि पीओकेचे कथित पंतप्रधान राजा मोहम्मद फारूक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाज शरीफ सध्या उपचारासाठी लंडनमध्ये आहेत.
2 / 10
लंडनहून नवाज शरीफ हे इम्रान सरकार आणि पाकिस्तान लष्करावर सतत टीका करत आहेत. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्याविरूद्ध इस्लामाबाद उच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटलाही दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांनंतर विरोधक सरकारविरूद्ध भव्य रॅली काढणार होते.
3 / 10
लाहोर पोलिसांनी शरीफ, मरियम आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. शरीफ यांचा जावई मोहम्मद सफदार यांच्या विरोधात देश आणि सरकारी संस्थांविरूद्ध लोकांना भडकवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या तीन सेवानिवृत्त जनरलची नावेही आहेत.
4 / 10
पाकिस्तानचे पत्रकार हमीद मीर यांनी सोमवारी ट्विट केले, पंतप्रधान इम्रान खान हे स्वत:ला काश्मीरचा चॅंपियन मानतात, परंतु पंजाब पोलिसांच्या एफआयआरमध्ये पीओकेचे निवडलेले पंतप्रधान फारूक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 / 10
एफआयआरमध्ये असं म्हटले आहे की शरीफ यांनी लंडनहून पाकिस्तानच्या प्रतिष्ठित संस्थांविरोधात भडकाऊ भाषण केले. पाकिस्तानमधील नागरिक बद्र राशिद यांनी ही एफआयआर दाखल केली आहे.
6 / 10
एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की २० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी नवाज शरीफ यांनी आपल्या भाषणांमध्ये भारताच्या धोरणांना पाठिंबा दर्शविला आहे जेणेकरुन पाकिस्तान मनी लॉन्ड्रींग आणि दहशतवादांना फंडिंग करणाऱ्या एक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्ट समाविष्ट केले जावे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही नवाज शरीफ यांच्यावर भारताशी मैत्री करण्याचा आरोप केला.
7 / 10
शरीफ यांचे भाषण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानला वेगळं करुन एक अयशस्वी राष्ट्र घोषित करण्याच्या उद्देशाने केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. नवाज शरीफ लोकांना निवडून दिलेल्या इम्रान खान सरकारच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय नवाज शरीफ त्यांचे मित्र नरेंद्र मोदी यांना फायदा व्हावा म्हणून काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनांवरुन लक्ष वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत असं तक्रारीत म्हटलं आहे.
8 / 10
व्हिडीओच्या माध्यमातून केलेल्या भाषणात नवाज शरीफ म्हणाले की, ते केवळ पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्धच नव्हे तर ज्यांनी त्यांना सत्तेत आणले त्यांच्याविरूद्ध लढत आहे. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या सैन्यावरही निशाणा साधला, तेव्हापासून इम्रान खान सरकारचे अनेक मंत्री आणि स्वत: इम्रान खान शरीफ यांना भारताच्या उद्देशाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत आहेत.
9 / 10
मात्र, जेव्हा टीका होऊ लागली तेव्हा पाकिस्तान सरकार या प्रकरणात यू टर्न घेताना दिसत आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दावा केला आहे की, नवाज शरीफ आणि पीएमएल (एन) यांच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला नोंदविण्याबाबत इम्रान खान यांना माहिती नव्हती
10 / 10
इम्रान खान यावर खुश नसल्याचा दावा फवाद चौधरी यांनी केला. फवाद यांच्या म्हणण्यानुसार इम्रान खान म्हणाले की त्यांचा पक्ष कधीही देशद्रोहाच्या खटल्याचा वापर करत नाही, परंतु शरीफ यांच्या सरकारच्या काळात ही त्यांची रणनीती होती.
टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफPOK - pak occupied kashmirपीओके