शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:07 IST

1 / 8
गेल्या काही काळापासून आक्रमक विस्तारवादी धोरण अवलंबलेल्या अमेरिकेने आज रशियाचा तेलाचा टँकर जप्त केल्याने जागतिक पातळीवरील तणाव अधिकच वाढला आहे. तसेच रशियाकडून अमेरिकेवर हल्ला केला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे. तसेच संघर्ष झाल्यास रशियाकडे अशी काही शस्त्रास्त्रे आहेत ज्याच्या जोरावर रशिया अमेरिकेच्या नाकी दम आणू शकतो.
2 / 8
रशियाच्या स्टेट डुमाचे डेप्युटी आणि डिफेन्स कमिटीचे फर्स्ट डेप्युटी चेअरमन अॅलेक्सी झुरावलेन यांनी अमेरिकेने रशियाचा ध्वज असलेल्या तेल टँकरवर केलेली जप्तीची कारवाई ही सागरी दरोडेखोरी असल्याचा आरोप केला आहे. तसेच हा रशियन क्षेत्रावरील हल्ला असल्याचा दावा करत त्याविरोधात सैनिकी कारवाईच्या माध्यमातून प्रत्युत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. रशियाने पाणतीरांद्वारे हल्ला करून अमेरिकन तटरक्षक दलाची दोन जहाजे बुडवली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर रशियाकडे अशी कोणती शस्त्रे आहेत ज्याच्या जोरावर रशिया अमेरिकेला जेरीस आणू शकते हे आपण पाहुयात...
3 / 8
आरएस-२८ सरमत हे जगातील सर्वात शक्तिशाली आयसीबीएम क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही १८ हजार किमी एवढी प्रचंड आहे. हे क्षेपणास्त्र अनेक अण्वस्त्रे सोबत घेऊन जाऊ शकते. तसेच त्याच्याकडे अमेरिकन संरक्षण व्यवस्था भेदण्याची क्षमता आहे. तसेच ते काही मिनिटांमध्ये अमेरिकेच्या कुठल्याही शहराला नष्ट करू शकते.
4 / 8
अवानगार्ड हे हायपरसॉनिक ग्लाईड व्हेईकल आहे. त्याचा वेग ताशी २५ हजार किमी एवढा प्रचंड आहे. संरक्षण प्रणालीला गुंगारा देण्यात ते तरबेज आहे. तसेच अण्वस्त्र हल्ला करण्यात ते सक्षम आहे.
5 / 8
३ एम २२ जिरकॉन हे हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याचा वेग ११ हजार किमी प्रतितास एवढा प्रचंड आहे. जहाज किंवा जमिनीवर हल्ला करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकन नौदलाच्या कॅरियर किंवा बेसला लक्ष्य करू शकते. तसेच या क्षेपणास्त्राला रोखणं खूप कठीण आहे.
6 / 8
पोसाईडन हा आण्विक शक्तीवर चालणारा पाण्याखालून हल्ला करणारा अंडरवॉटर ड्रोन किंवा पाणतीर आहे. याची मारक क्षमता अमर्यादित आहे. तसेच तो अमेरिकन किनाऱ्यांवर रेडियोअॅक्टिव्ह त्सुनामी आणू शकतो.
7 / 8
बुरेवेस्तनिक हे आण्विक इंजिनावर आधारित क्रूझ क्षेणपास्त्र आहे. याची मारक क्षमताही अमर्यादित आहे. तसेच कमी उंचीवरून उड्डाण करून ती रडारला चकवा देते. तसेच सोबत अणस्त्रे वाहून नेत ते मोठा विध्वंस घडवून आणू शकते.
8 / 8
ही हत्यारे रशियासाठी ब्रह्मास्त्रासारखी आहेत. तसेच अमेरिकेला रोखण्यासाठी बनवण्यात आली आहेत. मात्र कुठलंही शस्त्र हे १०० टक्के यशस्वी ठरू शकत नाही. तसेच अमेरिकेची मिसाईल डिफेन्स प्रणाली आणि नौदलसुद्धा अत्याधुनिक आहे. त्यामुळे युद्ध झाल्यास रशिया आणि अमेरिका दोघांचंही प्रचंड नुकसान होऊ शकतं.
टॅग्स :russiaरशियाUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय