Russia Ukraine War: '11000 रशियन सैनिक ठार, मोठा शस्त्रसाठा नष्ट केला', युक्रेनचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 04:40 PM2022-03-06T16:40:11+5:302022-03-06T16:51:07+5:30

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 11वा दिवस आहे. या युद्धात ना पुतीन मागे हटत आहेत, ना झेलेन्स्की हार मानायला तयार आहेत. हा संघर्ष किती काळ चालणार याची कुणालाच काही माहिती नाही.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या युद्धात रशियालाही मोठा फटका बसला आहे. युक्रेनच्या लष्कराने आकडेवारीत मोठा दावा केला आहे.

आतापर्यंत 11 हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले गेले असून, 48 हेलिकॉप्टर, 285 टँक, 44 लष्करी विमाने, 60 इंधन टाक्या, 2 बोटींसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा नष्ट करण्यात आला आहे, असा दावा युक्रेनने केला आहे.

दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या चोवीस तासात रशियाने युक्रेनच्या झायटोमिर प्रदेशात चार Su-27 आणि एक मिग-29 विमाने, Radomyshal भागात Su-27 आणि Su-25 विमाने पाडली आहेत.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे की, युक्रेनमधील आतापर्यंत 1.5 दशलक्ष लोकांनी देश सोडून शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. बहुतेक लोकांनी पोलंड आणि रोमानियामध्ये आश्रय घेतला आहे, तर काही मोल्दोव्हा आणि स्लोव्हाकियामध्येही गेले आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. या युद्धात ना पुतीन मागे हटत आहेत, ना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष हार मानायला तयार आहेत. हा संघर्ष किती काळ चालणार याची माहिती नाही.

दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे लाखो लोकांना शेजारच्या देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. युद्धामुळे आतापर्यंत 15 लाख लोकांनी देश सोडला आहे.

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या 351 नागरिकांचा मृत्यू आणि 710 नागरिक जखमी झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने शनिवारी केला आहे.

UNHCR ने सांगितले की, डोनेस्तक आणि लुहान्स्क भागात 86 लोक मारले गेले तर 385 जखमी झाले. कीव व्यतिरिक्त चेरकासी, चेरनिहाइव्ह, खार्किव, खेरसन, ओडेसा, सुमी, झापोरोझ्ये आणि झिटोमिर प्रदेशात 265 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 322 लोक जखमी झाले आहेत.

दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेला अधिक लढाऊ विमाने पाठवावीत आणि रशियाकडून तेल आयात कमी करावी, जेणेकरून त्यांचा देश रशियाच्या लष्करी कारवाईला तोंड देऊ शकेल असे ‘भावनिक’ आवाहन केले आहे.

झेलेन्स्की यांनी शनिवारी यूएस खासदारांना एका खाजगी व्हिडिओ कॉलमध्ये सांगितले की, तो कदाचित हा त्यांचा शेवटचा कॉले असेल. एकतर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) द्वारे नो-फ्लाय झोन लागू करा किंवा अधिक सैनिक पाठवून आम्हाला मदत करा, असे झेलेन्स्की म्हणाले.