शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia-Ukraine War: जगावर अणुयुद्धाचं संकट?; रशियाच्या धमकीनंतर अमेरिकेनेही उचललं कडक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 9:20 AM

1 / 11
रशिया-यूक्रेन युद्धाचे पडसाद जगभरात पाहायला मिळत आहे. बलाढ्य रशियासमोर झुकण्यास यूक्रेन अद्यापही तयार नाही. यूक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांनी हातात शस्त्र घेत देशाचं रक्षण करत आहेत. यूक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याला अनेक अडचणी येत आहेत.
2 / 11
यूक्रेनचा प्रतिहल्ला पाहून रशियाचे राष्ट्रपती पुतिन चांगलेच भडकले आहेत. पुतिन यांनी आण्विक हल्ला करण्याची धमकीही दिली आहे. मात्र या आदेशामुळे जागतिक पातळीवर आण्विक युद्धाचं संकट उभं राहिलं आहे. त्यावर अमेरिकेने पलटवार केला आहे.
3 / 11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन(US President Joe Biden) यांनी न्यूक्लियर वेपन हायअलर्टवर ठेवलेत. त्यासोबत न्यूक्लियर तुकडीला अलर्ट दिला आहे. यूरोपचं रक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. न्यूक्लियर वॉरमुळे अमेरिकेला घाबरण्याचं कारण नाही. या हल्ल्याचं उत्तर अमेरिका देऊ शकते असं त्यांनी सांगितले.
4 / 11
बायडन यांनी पेंटागनला अलर्ट राहण्याचे आदेश दिलेत. मित्र राष्ट्र आणि भागीदारांना यूक्रेन-रशिया युद्धावर चर्चा करण्याचं आवाहन बायडन यांनी केले आहे. तसेच यूक्रेनच्या नागरिकांना आमचं समर्थन आहे. कारण ते त्यांच्या देशाचं रक्षण करत आहेत असंही बायडन म्हणाले.
5 / 11
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली. पण गेल्या ७७ वर्षात हे बहुधा पहिल्यांदाच घडलं होतं जेव्हा सोमवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जगातील सर्वात मोठी शक्ती मानल्या जाणाऱ्या व्यक्तीने एवढी कठोर भाषा वापरून इतर देशासाठी हा संदेश दिला होता.
6 / 11
एका जिद्दीमुळे संपूर्ण जग विनाशाकडे का ढकलले जात आहे? युक्रेनवरील विनाशकारी हल्ल्याच्या विरोधात अमेरिकेने आणलेल्या निषेधाच्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली आहे,
7 / 11
त्यांनी केवळ स्वत:चीच नाही तर जगातील प्रत्येक मानवाची चिंता व्यक्त केली आहे. रशियाला सल्ला देण्याचे उदाहरणही या देशाने ठेवले आहे. गुटेरेस म्हणाले की 'रशियन आण्विक सैन्याला हाय अलर्टवर ठेवणे ही घटनाही भयानक आहे. आपण अणुयुद्धाची कल्पना देखील कशी करू शकतो? असं त्यांनी म्हटलं.
8 / 11
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी दोन दिवसांपूर्वी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी केलेल्या भाषणात व्लादिमीर पुतिन यांनी जगातील सर्व देशांना धमकी दिली होती की, जर त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडेही शस्त्रे आहेत.
9 / 11
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे अणुयुद्धात रूपांतर होऊ शकते, हे पुतिन यांच्या हेतूवरून स्पष्ट झाले होते. गेल्या अनेक दशकांच्या जगाच्या इतिहासात असे घडलेले नाही, जेव्हा एखाद्या देशाने उघडपणे आण्विक हल्ल्याची धमकी दिली असेल.
10 / 11
अमेरिकेने सोमवारी रशियन सैन्याच्या हालचालींची सॅटेलाईट इमेज लॉन्च केली. युक्रेनची राजधानी कीवपासून फक्त २७ किलोमीटर दूर आहे, परंतु ते पुढे जात आहे. त्यामुळे पुढील काही तासांत ते कीव काबीज करू शकतात अशी शक्यता आहे.
11 / 11
कारण राष्ट्रपती पुतिन यांनी त्यांच्या सैन्याला २ मार्चपर्यंतचे टार्गेट दिले आहे. जर रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी ताब्यात घेतली, तर दोन देशांचे हे युद्ध काय स्वरूप धारण करेल, याची कल्पनाच करता येईल, असे जगातील सर्व तज्ज्ञांचे मत आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन