शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia: ना वेदना, ना भावना, रशिया तयार करतंय भयंकर सुपर सोल्जर, करणार विध्वंस, जग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 9:18 PM

1 / 8
रशियामध्ये सुरू असलेल्या अत्याधुनिकी मिलिट्री एक्स्पोने पुन्हा एकदा व्लादिमीर पुतीन यांच्या सुपर सोल्जर्सबाबत चर्चेला तोंड फोडले आहे. या मिलिट्री एक्स्पोमध्ये १५०० रशियन निर्मात्यांनी ७२ देशांच्या प्रतिनिधींना २८ हजारांहून अधिक लष्करी आणि दुहेरी उयोग होणाऱ्या उत्पादनांचे आधुनिक नमुने प्रदर्शित केले.
2 / 8
दरम्यान, द सनच्या एका रिपोर्टनुसार या एक्स्पोमध्ये रशियाने काही असे सैनिकही दाखवले, ज्यांच्या डोक्यावर खूप वायर लागलेल्या होत्या. रिपोर्टनुसार रशियाच्या सैन्यातील एक अधिकारी आपल्या सैनिकाची ब्रेन टेस्ट घेत होता. फोटोमध्ये रशियाच्या सैनिकी वेशातील एक प्रशिक्षणार्थी सैनिकाला एक अधिकारी तारांमध्ये जखडून असल्याचे दिसत आहे.
3 / 8
याआधी पाच वर्षांपूर्वी व्लादिमीर पुतीन यांनी जेनेटिकली मॉडिफाईड सुपर सैनिक तयार केल्याचा दावा केला. या सैनिकांना वेदना, भीती जाणवणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. आता रशियाच्या मिलिट्री एक्स्पोतील हा प्रकार पाहून पुतीन यांचा हा दावा खरा वाटत आहे.
4 / 8
पुतीन केवळ माणसांचा जेनेटिकदृष्ट्या बदलण्याबाबतच बोलत नव्हते तर अत्याधुनिक तंत्राने सज्ज असे रोबोसुद्धा रशियाने विकसित केले आहे. रशियाने एक असा रोबोटिक कुत्रा तयार केला आहे जो पाठीवर असलेल्या रॉकेट लाँचरमधून रॉकेट लाँन्च करू शकतो.
5 / 8
युद्धात कुठल्याही हत्याराला घाबरणार नाही, तसेच त्यांना वेदना होणार नाही अशा सैनिकांचं सैन्य तयार करण्याचा पुतीन यांचा इरादा आहे. एका युथ फेस्टिव्हलमध्ये पुतीन यांनी त्यांच्या मनातील कल्पना मांडली होती.
6 / 8
पुतीन यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे शास्त्रज्ञ जेनेटिक बदल करण्याच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे भविष्यात सैनिक कुठलीही वेदना सहन करू शकतील. हे सैनिक अण्वस्त्रांपेक्षाही धोकादायक असतील असा दावा पुतीन यांनी केला आहे.
7 / 8
मात्र या सुपर सोल्जरसाठी जगासोबत येऊन नैतिक दिशानिर्देश विकसित केले गेले पाहिजे, असे पुतीन यांनी स्पष्ट केले.
8 / 8
सुपर सोल्जर्सना भीती आणि वेदना जाणवणार नाहीत. त्यामुळे हे कुठल्याही मोठ्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी सक्षम असतील. त्यामुळे या सैनिकांना अगदी खतरनाक मानले जात आहे. जर रशियाने असे सैनिक तयार केले तर मोठ्या प्रमाणात हत्या करणाऱ्या सुपर सोल्जर्सची फौज पाश्चात्य देशांसाठी एक धोका म्हणून समोर येईल.
टॅग्स :russiaरशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिन