शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रशिया : मॉस्कोमध्ये तुफान बर्फवृष्टी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 5:59 PM

1 / 7
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.
2 / 7
मॉस्कोमध्ये शनिवारपासून (3 फेब्रुवारी) जोरदार वारे वाहत असून, तुफान बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
3 / 7
मॉस्कोच्या इतिहासात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी बर्फवृष्टी असल्याचं सांगितलं जात आहे.
4 / 7
मॉस्कोमधील अधिका-यांनी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
5 / 7
झाड अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरभरात जवळपास दोन हजार झाडं पडली आहेत.
6 / 7
बर्फवृष्टीमुळे तीन हजारांहून जास्त घरांतील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
7 / 7
बर्फवृष्टीमुळे तीन हजारांहून जास्त घरांतील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
टॅग्स :Snowfallबर्फवृष्टी