शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भयंकर, भीषण, भयावह! गेल्या 4 आठवड्यांत जगभरात 75% रुग्णांमध्ये 'डेल्टा व्हेरिएंट'; WHO चा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 2:13 PM

1 / 13
कोरोनाचं संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत.
2 / 13
जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा आता पार केला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काही देशांमध्ये अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
3 / 13
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
4 / 13
डब्ल्यूएचओ साथीच्या आजाराबाबत दर आठवड्याला देत असलेल्या माहितीमध्ये डेल्टा व्हायरसच्या संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याचा विविध देशांचा प्रयत्न असला तरी विविध देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
5 / 13
गेल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद इंडोनेशियामध्ये झाली असून 3,50,273 नवे रुग्ण आहेत. ब्रिटनमध्ये 2,96,447 नवे रुग्ण, ब्राझीलमध्ये 2,87,610 नवे रुग्ण, भारतामध्ये 2,68,843 नवे रुग्ण, अमेरिकेमध्ये 2,16,433 नवे रुग्ण आढळून आले.
6 / 13
20 जुलैपर्यंत कोरोनाचे 24 लाख नमुने जिनोमिक माहितीसाठी पाठविण्यात आले. त्यातील दोन लाख 20 हजारांहून अधिक नमुने डेल्टा प्रकाराचे असल्याचे दिसले. डेल्टामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
7 / 13
ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, डेन्मार्क, भारत, इंडोनेशिया, इस्राईल, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशांमध्ये ‘डेल्टा’चा प्रभाव 75 टक्क्यांहून अधिक असल्याचं दिसलं आहे.
8 / 13
डेल्टामुळे कोरोनाच्या इतर प्रकारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून येत्या काळात डेल्टाचाच प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. जगभरात अल्फा प्रकारचे विषाणू 180 देशांत, बीटा प्रकारचे विषाणू 130 देशांत, गॅमा प्रकारचे 78 देशांत, तर डेल्टा प्रकारचे 124 देशांत रुग्ण नोंदविले गेले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 13
अमेरिकेसारखे अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. कोरोनावर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. यातच लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
10 / 13
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या नव्या रिपोर्टमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 40 लाखांहून अधिक मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे.
11 / 13
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या रिपोर्टनुसार, 15 जुलैपर्यंत सुमारे 40.09 लाख मुलांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
12 / 13
गेल्या आठवड्यात 23,500 हून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत लहान मुलांची कोरोना बाधित होण्याची संख्या 14.2 टक्के एवढी आहे. रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांमध्ये 1.3 ते 3.6 टक्के रुग्ण लहान मुलं आहेत.
13 / 13
अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या लहान मुलांचा मृत्युदर 0 ते 0.26 टक्के एवढा आहे. कोरोना व्हायरसमुळे लाखो लहान मुलं अनाथ झाले आहेत. आत्तापर्यंत जगातील 21 देशांमध्ये 15.62 लाख मुलांनी आपले आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावले आहेत. यापैकी 1,16,263 मुले ही भारतातील आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू