अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:07 IST
1 / 9जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी शेकडो वर्षांपूर्वी जुलै २०२५ मध्ये पृथ्वीवर मोठा विनाश होणार असल्याचे भविष्यवाणी केली आहे. याचबरोबर स्वप्नांवरून भाकीत करणाऱ्या जपानी मंगा कलाकार रियो तात्सुकी हिने देखील तारीख जाहीर करत जपानमध्ये मोठा विनाश होणार असल्याचे म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तात्सुकी हिच्या आधीच्या चार भविष्यावाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 2 / 9यामुळे जगभरातून जपान व आजुबाजुच्या देशांतील पर्यटनाचे बुकिंग, मिटींग आदी रद्द करण्यात येत आहेत. या तारखेला आता केवळ २० दिवस उरले आहेत. जपानी सरकारने देखील तयारी सुरु केली असल्याचे समजते आहे. 3 / 9जुलैने अवघ्या जगाला धडकी भरविली आहे. हा असा महिना आहे ज्याकडे इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र एकाचवेळी इशारा देत आहेत. शतकांपूर्वी बाबा वेंगाने जे सांगितलेले तो धोका आता घोंघावू लागला आहे. 4 / 9तात्सुकी यांनी त्यांच्या 'द फ्युचर आय सॉ' या ग्राफिक पुस्तकात लिहिले आहे की जुलैमध्ये जपानमध्ये एक मोठी आपत्ती येईल. परंतू ती कोणत्या प्रकारची असेल ते त्यांनी सांगितलेले नाही. 5 / 9अनेक जण या भविष्यवाणीकडे अंधविश्वास म्हणून पाहत आहेत. परंतू याच तात्सुकी यांनी २०११ मध्ये जपानमध्ये त्सुनामी येण्याचे भाकीत केले होते. काही लोक रियो तात्सुकी यांना 'न्यू बाबा वेंगा' असेही म्हणतात. त्यांच्या 'द फ्युचर आय सॉ' या कॉमिक पुस्तकात, तातसुकी यांनी ५ जुलै २०२५ रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली आहे. 6 / 9सोशल मीडियावर न्यू बाबा वेंगा यांच्या या इशाऱ्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांवरही परिणाम दिसत असून त्यांची टूर ते रद्द करत आहेत. लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधत आहेत, काही भूकंपांबद्दल बोलत आहेत, तर काही सायबर हल्ल्यांची भीती व्यक्त करत आहेत.7 / 9हाँगकाँग ते जपानमधील फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५०% घट झाली आहे. काही भागात ही घट ८३% पर्यंत पोहोचली आहे, असे ब्लुमबर्गने आपल्या बातम्यांत म्हटले आहे. 8 / 9चीन, थायलंड आणि व्हिएतनाममधील अनेक लोक आता त्या तारखेच्या आसपास जपानला जाणारे त्यांचे प्रवास टाळत आहेत किंवा पुढे ढकलत आहेत. जपान सरकारने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले असले तरी, भीतीचा आर्थिक परिणाम होऊ लागला आहे.9 / 9१९९५ चा कोबे भूकंप असेल किंवा २०११ चा तोहोकू भूकंप आणि त्सुनामी... सर्व खरे ठरले आहे. तसेच २०२० मध्ये एका प्राणघातक विषाणूच्या प्रसाराचेही भाकीत तिने केले होते. कोरोना व्हायरसचा संबंध या भाकीतासोबत जोडला जात आहे. प्रसिद्ध गायक आणि क्वीन बँड दिग्गज फ्रेडी मर्क्युरी यांच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती.