शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

3 मुलांच्या आईने BF वर ओतले उकळते पाणी अन् सिगारेटचे चटके दिले, ब्युटी पार्लरचे पैसे न दिल्याने घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 21:36 IST

1 / 6
महिलेने तिच्या प्रियकरावर उकळते पाणी ओतले आणि नंतर सिगारेटने अनेक ठिकाणी डागले. या महिलेने ब्युटी पार्लरमध्ये बोटॉक्स ट्रीटमेंट करून घेतली होती आणि प्रियकर तिला पैसे देत नव्हता म्हणून महिलेने प्रियकरावर अत्याचार केल्याचे सांगितले जात आहे.
2 / 6
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बॉयफ्रेंडवर अत्याचार करणाऱ्या महिलेचे नाव सारा डेविस आहे. तिचे वय 33 वर्षे आहे.
3 / 6
साराने तिच्या प्रियकर मार्क केनेडीचे अपहरण केले आणि तिला सुमारे १२ तास कैदेत ठेवले. प्रियकराचे अपहरण केल्यानंतर, महिलेने प्रथम त्याच्या डोक्यावर उकळते पाणी ओतले, ज्यामुळे तो चांगलाच पोळून निघाला.
4 / 6
यानंतर महिलेने सिगारेट पेटवली आणि प्रियकराला सिगारेटने चटके दिले. प्रियकर वेदनेने ओरडत राहिला पण महिलेला त्याची दया आली नाही. ती महिला प्रियकरावर अत्याचार करत असताना तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती.
5 / 6
कशीतरी महिलेच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित प्रियकराने पोलीस ठाणे गाठून महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आणि नंतर कोर्टाने महिलेला 6 वर्षे 4 महिन्यांची शिक्षा सुनावली.
6 / 6
विशेष म्हणजे, महिलेने प्रियकरावर तिच्या 2 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. मात्र, तपासात महिलेचा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकLondonलंडन