शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

१ महिन्यात ५ वेळा भेटले, १० महिने अफेअर अन्...: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात आणखी एक ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:24 IST

1 / 11
पोर्नस्टार स्टार्मी डेनियल्स प्रकरणात कोर्टाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर १.२२ लाख डॉलर दंड ठोठावला आहे. ही रक्कम स्टार्मी डेनियल्स दिली जाईल. परंतु आता या प्रकरणी आणखी एक नाव समोर आले आहे.
2 / 11
कोर्टात सुनावणीवेळी प्रॉसीक्यूटरनं ट्रम्प यांच्यावर आरोप लावत त्यांना आणखी एका महिलेला नुकसान भरपाई द्यावी लागेल असं म्हटलं. या महिलेचे नाव कॅरेन मॅकडोगल असं आहे. करेन ही अमेरिकेचे प्रसिद्ध मॅगझिन प्लेबॉयची मॉडेल होती.
3 / 11
डेनियल्ससारखा तिचाही दावा आहे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्याशी शारिरीक संबंध ठेवले. १० महिने आमच्यात अफेअर सुरू होते. मात्र कॅरेन मॅकडोगलचे सर्व आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावले. असं कधी झालेच नव्हते असं ट्रम्प म्हणाले.
4 / 11
अमेरिकेतील इंडियाना येथे जन्मलेली मॅकडोगल वयाच्या २० व्या वर्षापासून मॉडेलिंग करत आहे. तिचे कुटुंब मिशिगनमध्ये राहते. लहानपणापासूनच पोहण्याच्या स्पर्धांमध्ये तिने भाग घेण्यास सुरुवात केली. मॉडेलिंग पिक्चर्समुळे ती लोकप्रिय झाली आणि प्लेबॉयसाठी काम करू लागली.
5 / 11
प्लेबॉयसाठी काम करताना तिने १९९८ मध्ये 'प्लेमेट ऑफ द इयर' पुरस्कार पटकावला. अँडरसन पामेलानंतर सर्वात लोकप्रिय मॉडेल ठरली. मॅकडोगल ही ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मॉडेल होती. मॅकडोगलने पामेला अँडरसनच्या मागे दुसरे स्थान पटकावले
6 / 11
९० च्या दशकातील प्लेमेट म्हणून तिची निवड झाली. तेव्हापासून ती फिटनेस मॉडेल म्हणून काम करू लागली. १९९९ मध्ये, मॅकडोगल पुरुषांच्या फिटनेस मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणारी पहिली महिला मॉडेल बनली. मॅकडोगल चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसली, तिचे सर्वाधिक लक्ष मॉडेलिंगवर होते.
7 / 11
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मॅकडोगलची पहिली भेट २००६ मध्ये लॉस एंजेलिसमधील प्लेबॉय मॅन्शनमध्ये झाली होती. ती द अप्रेंटिसच्या एका एपिसोडचे शूटिंग करत होती. मी विवाहित होती तरीही डोनाल्ड ट्रम्प मला पसंत करू लागले असा दावा तिने केला.
8 / 11
ट्रम्प माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू लागला. आम्ही एका महिन्यात पाच वेळा भेटलो. ट्रम्प आणि तिच्यातील प्रेम सहमतीने होते आणि ट्रम्पने तिच्यावर जबरदस्ती केली नाही असंही ती म्हणाली. २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मॅकडोगलने अमेरिकन वृत्तपत्र नॅशनल एन्क्वायररसोबत १.२५ कोटी रुपयांचा करार केला होता.
9 / 11
याच सेटलमेंटने तिला कथित अफेअरबद्दल जाहीरपणे बोलण्यास मनाई केली. यामुळेच यासंबंधीचा लेख कधीच प्रसिद्ध झाला नाही आणि या नात्याबद्दल काही न बोलण्यासाठी दबाव टाकला. या करारानंतर त्या वृत्तपत्राने ट्रम्प यांच्याबद्दलच्या नकारात्मक बातम्या दडपण्यास सुरुवात केली.
10 / 11
तिच्या अधिकृत वेबसाइटवर, कॅरेन स्वत: ला मॉडेल, स्तंभलेखक, वकील आणि स्पोक्स मॉडेल म्हणून ओळख सांगितली आहे. ती स्वतः महिलांना ब्रेस्ट इम्प्लांटमुळे होणाऱ्या आजारांबद्दल जागरूक करते. मॅकडोगलने २०१७ मध्येच तिचे ब्रेस्ट इम्प्लांट काढले होते.
11 / 11
एवढेच नाही तर २०१८ मध्ये मॅकडोगनने डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानियाशी पतीसोबत केलेल्या अफेअरबद्दल माफी मागितली होती. ती म्हणाली होती, जेव्हा मी माझ्या भूतकाळात पाहते तेव्हा मला स्वतःच चुकीचे केले वाटते.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका