शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kim Jong Un: क्रूर! काकाच्या छातीवर बसून किमने मुंडके छाटलेले; ९ वर्षांनी आत्यासोबत दिसला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 3:41 PM

1 / 9
प्‍योंगयांग: उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हा त्याची आत्या किम क्‍योंग सोबत गेल्या ९ वर्षांत पहिल्यांदाच एकत्र दिसला आहे. किम क्‍योंग हुई ही किम जोंगचे वडील किम जोंग इल यांची बहीण आहे. ती शेवटची २०२०मध्ये सार्वजनिकरित्या दिसली होती.
2 / 9
किम जोंग उनने तिचा नवरा जांग सांग थायक यांचा देशद्रोहाच्या आरोपाखाली गळा कापून हत्या केली होती. तेव्हापासून क्‍योंग हुई या बेपत्ता झाल्या होत्या. आता जशी किम जोंग उनची बहीण किम यो जोंग हिचा आता जसा प्रभाव आहे तसाच किमच्या वडिलांच्या काळात या आतेबाईंचा होता.
3 / 9
किम जोंग उनने तिच्या नवऱ्याला खतरनाक कुत्र्यांच्या हवाली केले, नंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आगीतही फेकले होते.
4 / 9
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किमने काकाचा शीर धडावेगळे केलेला मृतदेह उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांना दाखविला होता, असा दावा केला आहे.
5 / 9
वॉशिंग्टन पोस्टचे संपादक आणि शोध पत्रकार बॉब वुडवर्ड यांचे पुस्तक रेज यात या घटनेचा उल्लेख आहे. 2013 मध्ये, किम जोंगचे काका जांग सांग थायक हे उत्तर कोरियाच्या सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक होते. दोघांमध्ये कशावरून तरी खटका उडाला आणि त्याने काकाचा खून केला.
6 / 9
लेखकाला ट्रम्प यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत. ट्रम्प यांनी ते आणि किम चांगले मित्र असल्याचा दावा केला होता. किम आपल्याला साऱ्या गोष्टी सांगतो असे ट्रम्प यांचे म्हणणे होते.
7 / 9
काकाची हत्या केली आणि त्याचे डोके पायाखाली टाकले. त्याच्या छातीवर बसून शीर धडावेगळे केल्याचे किमने ट्रम्प यांना सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी थायक यांना कशाप्रकारे मारण्यात आले हे आजवर समोर आलेले नाही.
8 / 9
थायक यांना देशात काही सुधारणा करायच्या होत्या. मात्र, ते किमला आवडले नाही. यावरून वाद झाला आणि किमने थायक आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांची हत्या केल्याचे सांगितले जाते.
9 / 9
किम जोंग उनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर थायक यांनीच किमला त्यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी मदत केली होती. नंतर किमच त्यांच्यासाठी काळ बनला. किमसोबत बऱ्याच दिवसांनी त्याची पत्नी री सोल जू देखील दिसली.
टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया