शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पृथ्वीवरील एकुलता एक असा ज्वालामुखी ज्यातून निघतो निळा लाव्हारस, आगही आहे इथे निळी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 6:29 PM

1 / 9
इंडोनेशियाच्या जावामध्य बानयूवांगी रीजेंसी आणि बोंडोवोसो रीजेंसीच्या सीमेवर असा ज्वालामुखी ज्यातून निळा लाव्हारस निघतो. हा ज्वालामुखी आपल्या चार गोष्टींसाठी ओळखला जातो. पहिला निळा लाव्हा, निळी आग, अॅसिडीक क्रेटर झील आणि सल्फरच्या खननासाठी. या ज्वालामुखीचं नाव आहे कावा इजेन ज्वालामुखी. (फोटोः मशूदी सोजोनो/अन्स्प्लैश)
2 / 9
कावा इजेन ज्वालामुखीचा शेवटी 1999 मध्ये उद्रेक झाला होता. कारण यातून निघणारा लाव्हारस नेहमीच वैज्ञानिकांच्या स्टडीचं सेंटर बनलं आहे. या ज्वालामुखीचा काल्डेरा साधारण 20 किलोमीटर रूंद आहे. इथे अनेक डोंगरांचा कॉम्प्लेक्स आहे. ज्यात गुरूंग मेरापी स्ट्रॅटोवॉल्कनो सर्वात भयावह आहे. इथून निळी आग आणि निळा लाव्हा निघतो. (फोटोः ट्विटर/oneironaut)
3 / 9
इथे एक क्रेटर आहे जे 1 किलोमीटर व्यासाचं आहे. इथे निळ्या रंगाचं पाणी आहे. जे पूर्णपणे अॅसिडीक आहे. म्हणजे तेजाबचा तलाव. लोक इथून सल्फरचं खनन करून नेतात. इथे सल्फर करणाऱ्या मजुरांना एका दिवसाचे 13 डॉलर म्हणजे 1013 रूपये मिळतात. (फोटोः ट्विटर/oneironaut)
4 / 9
कावा इजेन ज्वालामुखीचं क्रेटर जेथून निळी आग आणि निळा लाव्हारस निघतो त्याचा व्यास 722 मीटर आहे. हे क्रेटर 200 मीटर खोल आहे. या क्रेटरमध्ये सल्फ्यूरिक अॅसिडचं प्रमाण फार जास्त आहे. येथील सरोवराला जगातील सर्वात मोठी अॅसिडीक लेक मानली जाते. इथून धातुंची एक नदीच वाहते. (फोटोः ट्विटर/oneironaut)
5 / 9
जेव्हापासून या क्रेटरबाबत नॅशनल जिओग्राफीने स्टोरी केली तेव्हापासून इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. आता इथे लोक रात्री माउंटेन हायकिंगसाठी येतात. जेणेकरून निळा लाव्हा निघताना किंवा वाहताना बघता यावा. दोन तासांच्या ट्रेकिंगनंतर लोक ज्वालामुखीच्या क्रेटरच्या रिमपर्यत पोहोचतात. नंतर 45 मिनिटांच्या ट्रेकिंगनंतर तेजाबच्या सरोवराजवळ पोहोचतात. (फोटोः प्रशांत दत्ता/अन्स्प्लैश)
6 / 9
या ज्वालामुखीवर येणाऱ्या पर्यटकांना केमिकल मास्क लावावा लागतो. तसं केलं नाही तर सल्फरच्या गंधाने त्यांची तब्येत बिघडू शकते. सलफ्यूरिक गॅस निघत असल्याने येथील आगीचा रंगही निळा दिसतो. क्रेटरचं तापमान 600 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. क्रेटरमधून निघणाऱ्या आगीच्या लपटांची लांबी 16 फूट असते. (फोटोः सैद अलमरी/अन्स्प्लैश
7 / 9
कावा इजेन ज्वालामुखी जगातील एकुलता एक असा ज्वालामुखी आहे जिथे निळ्या रंगाची आग आणि लाव्हारस निघतो. स्थानिक लोक याला अपी बीरू म्हणजे निळी आग म्हणतात. तेजाबच्या सरोवराजवळ एक जमिनीखाली जाणारा रस्ता आहे. इथून सल्फर बाहेर येतं. जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा लाल रंगाचं असतं. बाहेर येताच निळं दिसू लागतं. (फोटोः मेक्सिम इवाशेंको/अन्स्प्लैश)
8 / 9
नंतर जेव्हा हा थंड होतो तेव्हा पिवळ्या रंगाचा दिसतो. येथील मजूर वितळलेलं सल्फर सिरॅमिकच्या पाइपने वरून खालच्या दिशेने सोडतात. ते खाली येताच थंड होतं. खाली आलं की गोठतं. नंतर मजूर ते तोडून घेऊन जातात. मजूर दिवसातून दोनदा हे काम करतात. (फोटोः पिक्साबे)
9 / 9
दररोज ज्वालामुखीतून साधारण 200 मजूर 14 टन सल्फर काढतात. जिथून हे लोक सल्फर काढतात तेथील तापमान 45 ते 60 डिग्री सेल्सिअस दरम्यान असतं. (फोटोः जोंगनान बाओ/अन्स्प्लैश)
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सVolcanoज्वालामुखीInternationalआंतरराष्ट्रीय