शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jihadi Bride: 'जिहादी दुल्हन'ला सतावतेय मृत्यूची भीती, आता ब्रिटनला जाण्यासाठी अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 10:30 PM

1 / 7
'जिहादी दुल्हन' म्हणून परिचित असलेल्या शमीमा बेगमला आता मृत्यूची भीती सतावू लागली आहे. जेव्हा तिच्यावर दहशतवादी गुन्ह्यांसंदर्भात खठला चालवला जाईल, तेव्हा तिला मृत्यूदंड देण्यात येईल, अशी भीती तिला वाटू लागली आहे. यामुळे आता लवकरात लवकर सीरिया सोडून ब्रिटनला जाण्याची तिची इच्छा आहे.
2 / 7
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनची माजी रहिवासी असलेल्या 22 वर्षीय शमीमाला लवकरच दहशतवादाच्या आरोपांना सामोरे जावे लागणार आहे. कारण अधिकाऱ्यांनी तिच्या आयएससोबतच्या संबंधांसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.
3 / 7
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ISIS च्या दहशतवाद्यांसाठी आत्मघाती बॉम्बर तयार करण्यात मदत केली, असा आरोप शमीमावर आहे.
4 / 7
शमीमा बेगमचे सत्य समोर आल्यानंतर, 2019 मध्ये तिचे ब्रिटिश नागरिकत्व रद्द करण्यात आले होते.
5 / 7
शमीमा सध्या सीरियातील रोजावा येथील शरणार्थी शिबिरात आहे. हा एक स्वशासित प्रदेश असून तो सीरियन शासनाच्या नियंत्रणात नाही.
6 / 7
शमीमाच्या मित्रांनी सांगितले, की तिचा तेथील न्याय व्यवस्थेवर फारसा विश्वास नाही. यामुळे ती ब्रिटनला परतण्यास उत्सुक आहे.
7 / 7
एका सूत्राने म्हटले आहे, की 'सीरियामध्ये दहशतवादाच्या गुन्ह्यांखाली शमीमा बेगमवर खटला चालला आणि ती दोषी आढळली, तर तिला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल,' असे शमीमाला वाटते.
टॅग्स :ISISइसिसterroristदहशतवादीTerrorismदहशतवादEnglandइंग्लंडWomenमहिला