शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:32 IST

1 / 9
चीनमध्ये मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कदाचित चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग कायमचे सत्तेबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनमध्ये सारे काही आलबेल असल्याचे दाखविले जात असले तरी जिनपिंग यांचे १६ दिवस गायब होणे आणि नंतर सार्वजनिक कार्यक्रमांतून न दिसणे बरेच काही सांगून जात आहे.
2 / 9
२१ मे ते ५ जून या काळात जिनपिंग अचानक गायब झाले होते. त्यांचे सार्वजनिक कार्यक्रमच नाहीत तर चीनच्या सरकारी वृत्तपत्रांमध्ये साधा फोटोसुद्धा छापून आलेला नाही. २०१७ नंतर क्वचितच एक दिवस असा गेला असेल, परंतू गेल्या दीड महिन्यापासून चीनमध्ये वातावरण बदलले आहे.
3 / 9
चीनच्या पिपुल्स लिबरेशन आर्मीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आला आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. महत्वाची क्षेत्रे झगडत आहेत, यामुळे जिनपिंग यांच्यासमोर मोठे आव्हान होते, त्यात आता सत्तापालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 / 9
या काळात जे परदेशी नेते दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याशी चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि उपपंतप्रधान हे लाइफेंग हे भेट घेत आहेत. देशातील सर्वात प्रभावशाली वृत्तपत्र पीपल्स डेली आणि सरकारी एजन्सी शिन्हुआ यांनीही २ ते ५ जून दरम्यान जिनपिंग यांचा एकही फोटो प्रकाशित केला नाही. हा योगायोग नाही.
5 / 9
महत्वाचे म्हणजे येत्या ६-७ जुलैला ब्राझिलच्या रियो दी जानेरोमध्ये होत असलेल्या ब्रिक्स देशांच्या बैठकीलाही जिनपिंग जाणार नाहीत. गेल्या दोन आठवड्यांपासून जिनपिंग पुन्हा बेपत्ता झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वीच सम्राट शींचा शेवट होणार अशी भविष्यवाणी केली होती.
6 / 9
जिनपिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे (सीएमसी) अध्यक्ष आहेत. ६ जूनला चीनच्या राज्य परिषदेतील ५० हून अधिक मंत्री आणि उच्च अधिकाऱ्यांनी निष्ठेची शपथ घेतली, तेव्हा जिनपिंग उपस्थित नव्हते. परंतू, 'शी जिनपिंग विचारसरणी' तिथे वाचून दाखविण्यात आली.
7 / 9
२४ सदस्यांच्या शक्तिशाली पॉलिटब्युरोचे सदस्य असलेले झांग यांना माजी चीनी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांच्याशी निष्ठावंत राहिलेल्या सीसीपीच्या वरिष्ठ सदस्यांचा पाठिंबा आहे. हे लोक जिनपिंग यांच्यापेक्षा कमी कट्टरवादी आहेत.
8 / 9
वांग यांग यांना शी जिनपिंग यांचे उत्तराधिकारी म्हणून तयार केले जात आहे. वांग यांग हे एक टेक्नोक्रॅट आहेत आणि २०२२ मध्ये चीनमध्ये सर्वोच्च नेतृत्वासाठी ते एक प्रबळ दावेदार मानले जात होते.
9 / 9
जिनपिंग यांच्या जवळच्यांना बाजुला करणे, सैन्यात बदल करणे आणि यांग यांना पुन्हा पुढे आणणे म्हणजेच जिनपिंग यांना हळूहळू बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याचे मानले जात आहे. यामुळे चीनमधून लवकरच मोठी बातमी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
टॅग्स :Xi Jinpingशी जिनपिंगchinaचीन