डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:51 IST
1 / 9अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरच्या अपघातानंतर, बोईंग कंपनीच्या विमानांच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरे तर, १२ जूनपूर्वीही बोईंग विमानांना अनेक वेळा अपघात झाले आहेत. मात्र, आता जगाचे लक्ष वेधले आहे ते, बोईंग कंपनीच्या 'बोईंग बॉम्ब'ने.2 / 9द इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, सुमारे दोन दशकांपूर्वी अमेरिकन हवाई दलासाठी बोईंग बॉम्ब बनवण्यात आला होता. आता याचा वापर इराणचे अण्वस्त्र ठिकाणं नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. इराण-इस्रायल लढाईत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उघडपणे इस्रायलला पाठिंबा देत आहेत, यामुळे या युद्धात बोईंगचा वापर केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.3 / 9आपण इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी हा हल्ला केला असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. विशेषतः नतांज आणि इस्फहान यांसारख्या इराणचे प्रमुख अण्वस्त्र प्रकल्प मानल्या जाणाऱ्या भागात हल्ले करण्यात आले आहेत आणि आता पुढचे लक्ष्य फोर्डो आहे. 4 / 9महत्वाचे म्हणजे जर इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखायचे असेल, तर तेहरानपासून १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कौम शहराजवळील डोंगरात सुमारे ३०० फूट खोलवर असलेला फोर्डो इंधन समृद्धी प्रकल्प नष्ट करावा लागेल, हे इस्रायलला माहित आहे.5 / 9खरे तर, फोर्डो प्रकल्पावर हल्ला करणे इस्रायलसाठी सोपे नाही. कारण, फोर्डो प्रकल्प नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रे त्यांच्या शस्त्रागारात नाहीत. यामुळेच बोईंग बॉम्बची चर्चा सुरू आहे. 6 / 9बोईंग बॉम्बचा समावेश अमेरिकन हवाई दलाच्या सर्वात धोकादायक शस्त्रांच्या यादीत आहे. बोईंगचा GBU-५७ A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) बंकर बस्टर म्हणून ओळखला जातो. अमेरिकन डिफेन्स थ्रेट रिडक्शन एजन्सीने बोइंगला याची डिझाइन आणि मॅन्यूफॅक्चरिंगचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. 7 / 9बोइंग बॉम्बची ताकद - GBU-५७ A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर अमेरिकेच्या अत्याधुनिक बंकर बस्टिंग तंत्रज्ञानावर काम करतो. त्याचे वजन ३०, ००० पौंड अर्थात १३,६०० किलोग्रॅम आणि लांबी २०.५ फूट एवढी आहे. हा बॉम्ब जमिनीखाली जाऊन भूमिगत लक्ष्य नष्ट करू शकते. 8 / 9या बॉम्बचे वजन एवढे आहे की, तो केवळ अमेरिकेच्या B-२ स्पिरिट सारख्या बॉम्बरमध्येच बसवला जाऊ शकतो. 9 / 9हा बॉम्ब १३० फूट उंचीपर्यंतच्या खडकात आणि २०० फूट उंचीपर्यंतच्या काँक्रीटच्या पृष्ठभागात शिरू शकतो यावरूनच या बोईंग बॉम्बच्या शक्तीचा अंदाज लावता येऊ शकतो. या बॉम्बमधील GPS याला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यास मदत करते.