शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:39 IST

1 / 7
इस्रायल आणि इराण एकमेकांवर हल्ले करताना विध्वंसक क्षेपणास्त्रांचा वापर करू लागले आहेत. बुधवारी इराणने इस्रायलवर स्वदेशी बनावटीची सेजिसल मिसाईल डागली. इराणकडूनच याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे इस्रायलने दावा केला आहे की, ही मिसाईल यशस्वीपणे हवेतच नष्ट करण्यात आली.
2 / 7
इस्रायलवर डागण्यात आलेल्या सेजिल मिसाईलबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. सेजिल मोठी, दूरवर मारा करणारी आणि युद्ध काळातील शक्तिशाली मिसाईल आहे.
3 / 7
ही मिसाईल किती शक्तिशाली आहे, याचा अंदाज पुढील काही गोष्टींवरून लावता येईल. ही मिसाईल इराणच्या नतांज शहरातून सोडण्यात आली, तर ही मिसाईल इस्रायलच्या तेल अवीव शहरात फक्त सात मिनिटांत पोहचू शकते.
4 / 7
नंताज आणि तेल अवीव यांच्यातील अंतर जवळपास २००० किमी इतके आहे. बुधवारी रात्री इराणने केलेले हल्ले ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ३ चा भाग आहेत. इराणने इस्रायलविरोधातील या ऑपरेशनची सुरूवात टू-स्टेज सेजिल मिसाईलने केली, असे दिल्लीतील इराणच्या दूतावासाने म्हटले आहे.
5 / 7
सेजिल मिसाईल इंधनावर चालते. ही मिसाईल अचूक आणि प्रचंड शक्तिशाली अस्त्रांपैकी एक आहे. महत्त्वाचे ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता या मिसाईलची आहे. सेजिल मिसाईल १८ मीटर लांब आहे.
6 / 7
ही मिसाईल २००० किमीपर्यंत मारा करू शकते. या मिसाईलच्या माध्यमातून इराण इस्रायलच नव्हे, तर दक्षिण पूर्व युरोप आणि मध्य आशियातील काही ठिकाणांसह मध्य पूर्वेतही हल्ला करू शकतो. इतकी क्षमता या मिसाईलची आहे.
7 / 7
तब्बल ७०० किलो स्फोटके घेऊन जाण्याची क्षमता या मिसाईलची आहे. त्यामुळे ही मिसाईल एखादे ठिकाणे नष्ट करण्यासाठी शक्तिशाली ठरते. सेजिल मिसाईलची पहिली यशस्वी चाचणी २००८ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी या मिसाईलने ८०० किमी अंतर पार केले होते.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध