शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:33 IST

1 / 8
इराणने इस्रायल आणि इराणमधील युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर केला आहे. या बॉम्बमुळे सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
2 / 8
आयडीएफने म्हटले आहे की, १९ जूनला इराणने डागलेल्या किमान एका क्षेपणास्त्रात क्लस्टर बॉम्ब वॉरहेड होते. दोन्ही देशांमधील या युद्धात पहिल्यांदाच हा बॉम्ब वापरण्यात आला आहे. काय आहे हा क्लस्टर बॉम्ब?
3 / 8
क्लस्टर म्युनिशन अथवा बॉम्ब म्हणजे असा बॉम्ब ज्यामध्ये अनेक लहान लहान बॉम्ब असतात. हा क्लस्टर बॉम्ब हवेत उघडतो आणि त्यातून बाहेर पडणारे छोटे ‘बॉम्ब’ खूप मोठ्या भागात पडतात आणि त्याचे स्फोट होतात.
4 / 8
हे बॉम्ब एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करून टँक आणि लष्करी शस्त्रे, तसेच सैनिकांना नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले असतात.
5 / 8
क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्याच्या करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
6 / 8
भारतासह १६ देशांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यावरून हे स्पष्ट होते की, भारताने आतापर्यंत हा बॉम्ब वापरला नसला तरी गरज पडल्यास त्याचा वापर करू शकतो.
7 / 8
२००८ मध्ये क्लस्टर बॉम्बच्या वापराविरुद्ध एक करार झाला होता. या आंतरराष्ट्रीय करारात क्लस्टर बॉम्बचा वापर, साठवणूक, हस्तांतरण आणि उत्पादन करण्यास बंदी आहे.
8 / 8
एकूण १११ देश आणि १२ इतर संस्थांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. परंतु, इराण, इस्रायल आणि अमेरिकेसह प्रमुख देशांनी करारात सामील होण्यास नकार दिला आहे.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धBombsस्फोटके