By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:18 IST
1 / 7परदेशात फिरायला जाणे म्हणजे लाखो रुपयांचा खर्च आला, असे आपल्याला वाटते. पण जगात एक असाही देश आहे जिथे तुमच्या खिशातील अवघे १ हजार रुपये तुम्हाला कागदावर का होईना पण 'करोडपती' बनवू शकतात. हा देश आहे इराण. 2 / 7सध्या इराणच्या चलनात (इराणी रियाल) मोठी घसरण झाल्यामुळे भारतीय रुपयाचे मूल्य तिथे गगनाला भिडले आहे. अधिकृत विनिमय दराचा विचार केला तर, १ भारतीय रुपयाची किंमत साधारणपणे ४६३ ते ५०० ईराणी रियाल इतकी आहे. म्हणजेच तुमचे १ हजार रुपये ५ लाख रियालमध्ये बदलतात. 3 / 7पण खरा खेळ 'ओपन मार्केट' किंवा ब्लॅक मार्केटमध्ये सुरू होतो. इथे १ भारतीय रुपयाची किंमत चक्क १५,३०० ते १६,००० रियालपर्यंत आहे. या हिशोबाने जर तुम्ही १००० रुपये सोबत नेले, तर त्याचे मूल्य १.५ ते १.६ कोटी रियाल इतके होते.4 / 7इराणच्या चलनाची ही दुर्दशा अचानक झालेली नाही. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने, विशेषतः अमेरिकेने त्यांच्यावर कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे इराणची तेल निर्यात ठप्प झाली असून बँकिंग व्यवहारही जागतिक यंत्रणेतून बाहेर फेकले गेले आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या चलनावर झाला असून २०२५ च्या अखेरीस तिथे महागाईचा दर ४२ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.5 / 7इराणचे अधिकृत चलन 'रियाल' असले तरी, तिथले स्थानिक लोक व्यवहार करताना 'तोमान' या शब्दाचा वापर करतात. १० रियाल म्हणजे १ तोमान होतो. त्यामुळे बाजारात व्यवहार करताना किंमत तोमानमध्ये सांगितली जाते.6 / 7श्रीमंतीचा भास, पण वास्तव भयाण! कागदावर तुम्ही करोडपती दिसत असलात, तरी इराणमधील जीवन सुखकर नाही. अतोनात महागाईमुळे तिथे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे खिशात लाखो-कोडो रुपये असूनही तिथे खरेदी करण्याची शक्ती मर्यादित आहे. 7 / 7आयात बंद असल्यामुळे अनेक वस्तू मिळत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर, रुपयाचे मूल्य तिथे जास्त असले तरी प्रत्यक्षात तिथली गरिबी आणि महागाई पर्यटकांच्या खिशाला परवडणारी असली तरी तिथल्या नागरिकांसाठी मात्र मोठा शाप ठरली आहे.