1 / 8ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय नौदल पाकिस्तानच्या युद्धनौका, बंदरांवर हल्ले चढविण्यासाठी आदेशाची वाट पाहत होते. पाकिस्तानी समुद्राला भारतीय युद्धनौका आणि पाणबुड्यांनी घेरलेले होते. पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौका बंदरातून बाहेरच पडल्या नाहीत. भारतीय नौदलाला जर आदेश मिळाले असते तर पाकिस्तानी युद्धनौकांना बंदरावरच बुडविता आले असते. परंतू, या युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या याचे कारण आता समोर आले आहे. 2 / 8पाकिस्तानी नौदलाची हालत खस्ता झाल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. कारण त्यांचा मेंटेनन्स करण्यासाठी पैसा नाही, यामुळे त्या समुद्राऐवजी बंदरातच गंज खात पडून आहेत. 3 / 8ऑपरेशन सिंदूरनंतर तर पाकिस्तानी नौदलाची स्थिती आणखी बिकट झालेली आहे. पाकिस्तानी पाणबुड्यांची ताकदही कमी होत आहे, त्या देखील डॉकयार्डमध्ये गंजत पडल्या आहेत. यामुळे पाकिस्तानी नौदलाला युद्धाभ्यासही करता येत नाहीय. 4 / 8एकीकडे भारतीय नौदलाची ताकद वाढत आहे. एकामागोमाग एक नव्या युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात येत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी नौदल अमेरिका आणि चीनमुळे शक्तीहीन होत चालले आहे. आणखी काही वर्षांनी पाकिस्तान पाण्यात भारताविरोधात लढू देखील शकणार नाही, अशी केविलवाणी अवस्था होणार आहे. 5 / 8समुद्रात बंदोबस्तासाठी देखील तैनात ठेवण्याच्या लायकीची जहाजे नौदलाकडे नाहीत. समुद्री ट्रॅकिंग डेटानुसार बहुतांश युद्धनौका या समुद्राऐवजी कराची नौदल तळावर बांधून ठेवण्यात आल्या आहेत. 6 / 8पाकिस्तानी सैन्याकडे जवानांना पगार देण्याएवढे देखील पैसे नाहीत. नौदलाकडे १९९० च्या दशकातील अमेरिकेकडून वापरलेल्या टाईप-२१ फ्रिगेट आहेत. त्यांचा मेंटेनन्स खूप महागडा आहे. सारखी दुरुस्ती करावी लागत आहे. अशातच या युद्धनौकांच्या निर्मात्या कंपनीने त्यांचे उत्पादन बंद केल्याने सुटे पार्टदेखील मिळत नाहीत. 7 / 8दुसरीकडे पाकिस्तानी नौदलाने चिनी युद्धनौका टाइप-054ए फ्रिगेट घेतल्या आहेत. या नव्या आहेत परंतू त्यांचे रडार एवढे खराब आहेत की सारखे सारखे त्यांना शिपयार्डकडेच न्यावे लागते. या नव्या युद्धनौकांच्या मेटेनन्सची कराची शिपयार्डमध्ये सोयच नाहीय. तसेच चीनने तंत्रज्ञानही हस्तांतर केलेले नाहीय. 8 / 8आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या बांधलेल्या युद्धनौकांमध्ये तरुण अधिकारी तैनात आहेत. या युद्धनौका समुद्रातच जात नसल्याने पाकिस्तानी नौदलाकडे अनुभवी सैनिकच उरलेले नाहीत. यामुळे पाकिस्तानी नेव्ही आणखी शक्तीहीन झाली आहे. ऑपरेशन सिंदूरने तर पाकिस्तानी नौसैनिकांचे मनोबलच खच्ची करून टाकले आहे.