माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
1 / 10२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्यानंतर दहशतवाद आणि त्यांना मदत करणाऱ्या आकांना कठोर शिक्षा दिली जाईल अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. 2 / 10या मोहिमेतंर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. त्यानंतर पाक सैन्याकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील सैन्य एअरबेसवर हल्ला केला. सॅटेलाईट कंपनी मॅक्सोर टेक्नोलॉजी यांनी हे फोटो घेतले आहेत. 3 / 10भारतीय सैन्याच्या अचूक हल्ल्यात पाकिस्तानी एअरफोर्सचे जवळपास २० टक्के नुकसान झाले. भारताच्या हल्ल्यात अनेक लढाऊ विमाने जळून राख झाली आहेत अशी माहिती समोर आली. ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सीमेवरील नागरी वस्तीत ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केले. 4 / 10हे सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने हाणून पाडले. पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने आक्रमक होत पाकिस्तानी हवाई दलाच्या शस्त्रसाठा डेपो, एअरबेस यांना टार्गेट केले. ज्यात सरगोधा आणि भोलारीसारख्या प्रमुख एअरबेसचा समावेश आहे. 5 / 10याठिकाणी पाकिस्तानी वायूसेनेचे एफ १६, जे १७ लढाऊ विमाने होती. भोलारी एअरबेसवर झालेल्या हल्ल्यास स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफसह ५० हून अधिक जवान ठार झाले. ज्यात वायूसेनेचे ४ जवान होते. ही बातमी इंडियन एक्सप्रेसनं सूत्राच्या हवाल्याने दिली आहे.6 / 10जैकबाबाद येथील शाहबाज एअरबेसवरील हल्ल्याच्या आधीचे आणि त्यानंतरचे सॅटेलाईट फोटो पाहिले तर पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट दिसून येते. एलओसीवरही भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत अनेक दहशतवाद्यांचे बंकर आणि पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या नष्ट केल्या. 7 / 10रहीम खान एअरबेस - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रहिम खान एअरबेस आहे. बहावलपूर येथून २०० किमी दक्षिणेकडे हा एअरबेस आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने बहावलपूर येथील दहशतवादी तळावर टार्गेट हल्ला केला. त्यात अनेक दहशतवादी मारले गेले.8 / 10एलओसीवरील गोळीबारात पाकचे ३५-४० जवान ठार झाल्याचे बोलले जाते. सोमवारी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानी एअरबेसवरील नुकसान आणखी सविस्तर सांगितले. त्यात ड्रोन, मिसाईल हल्ल्याचे पुरावे दिले. त्यातून भारतीय सैन्याची क्षमता आणि सुरक्षा व्यवस्था किती मजबूत आहे ते जगाला दिसून आले.9 / 10दरम्यान, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० लोकांसह १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. सैन्याच्या या कामगिरीनंतर संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद जगाला दिसली. भारत आज जगातील ८० देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करतो. मागील १० वर्षात त्यात ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.10 / 10२०२४-२५ या काळात खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादन निर्यात १५,२३३ कोटी रुपये आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत सरकारने सातत्याने संरक्षण क्षेत्रात स्वदेशी शस्त्रे निर्मितीला प्राधान्य दिले आहे. भारताने आकाश, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल, पिनाका रॉकेटसह के९ वज्र, बीओटी, डोर्नियर २२८ लढाऊ विमाने आणि हलक्या वजनाची तेजससारखी लढाऊ विमाने जगाच्या पसंतीत पडत आहे.