शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:00 IST

1 / 7
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराण संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प यांनी इराणला 'होर्मुझ स्ट्रेट' (होर्मुझ सामुद्रधुनी) मंगळवारी संध्याकाळपर्यंत खुला करा, अन्यथा इराणचे पॉवर प्लांट आणि पूल उद्ध्वस्त करण्यात येतील, अशी थेट धमकी दिली आहे. मात्र, अमेरिकेच्या या धमकीला न जुमानत इराणने एक मोठी अट ठेवली आहे.
2 / 7
काय आहे इराणची अट? - ट्रान्झिट टोलचा एक हिस्सा युद्धात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी वापरला जाणार असेल, तरच होर्मुझ स्ट्रेट खुला केला जाईल, असे इराणी राष्ट्राध्यक्ष कार्यालयातील अधिकारी मेहदी तबातबाई यांनी स्पष्ट केले आहे.
3 / 7
तसेच, इराणी संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी ट्रम्प यांना इशारा देत X वर लिहिले, 'तुमची बेजबाबदार कृती अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला जिवंत नरकाकडे ओढत आहे आणि आमचा संपूर्ण प्रदेश जळून खाक होईल, कारण आपण नेतन्याहू यांच्या आदेशाचे पालन करत आहात.'
4 / 7
अमेरिका इराणवर मोठा हल्ला कधी करणार? - डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अल्टिमेटम देत म्हटले आहे की, जर मंगळवार संध्याकाळपर्यंत कारवाई केली नाही, तर त्यांच्याकडे कोणतेही वीज प्रकल्प अथवा सुरक्षित पूल शिल्लक राहणार नाहीत. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करून अमेरिका इराणवर मोठा हल्ला कधी करणार हेही सांगून टाकले. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले, 'मंगळवारी रात्री ८ वाजता ईस्टर्न टाईमनुसार (भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी).'
5 / 7
दरम्यान, फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले, 'मला वाटते, सोमवार एका चांगला दिवस आहे. अजूनही चर्चा सुरू आहे. जर त्यांनी करार केला नाही, तर मी सर्व काही उडवून देण्याचा आणि तेल ताब्यात घेण्याचा विचार करत आहे.'
6 / 7
भारतावर काय परिणाम होणार? - या तणावामुळे भारताचे टेन्शनव वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारताकडे तेलाचा साठा असला तरी, एलपीजी पुरवठ्याचे आव्हान आहे. सरकारने ग्राहकांना पीएनजीवर शिफ्ट करण्यावर भर दिला असून गेल्या महिन्यात ८ लाख ग्राहक शिफ्ट झाले आहेत.
7 / 7
याव्यतिरिक्त, मध्यपूर्वेतून येणाऱ्या युरिया आणि डीएपी खतांच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता असून, होर्मुझचा मार्ग लवकर न उघडल्यास खतांचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाUSअमेरिकाWarयुद्धIndiaभारत