Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:47 IST
1 / 8हाँगकाँगमधील अनेक उंच इमारतींना लागलेल्या भीषण आगीतील मृतांचा आकडा ५५ वर पोहोचला आहे आणि २७९ जण अजूनही बेपत्ता आहेत, सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने हाँगकाँग पोलीस दलाचा हवाला देत सांगितलं की, बुधवारी वांग फुक कोर्टमध्ये लागलेल्या आग प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.2 / 8हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्र (HKSAR) चे मुख्य कार्यकारी जॉन ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगच्या इतिहासातील सर्वात भीषण आगीत २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत. या आगीत अनेक उंच इमारतींचा समावेश आहे. 3 / 8हाँगकाँगस्थित साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, किमान ६८ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यापैकी १६ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि २५ जणांची अत्यंत गंभीर आहे.4 / 8पोलिसांच्या तपासात असं दिसून आलं आहे की, इमारती झाकण्यासाठी वापरलेलं संरक्षक जाळं, वॉटरप्रूफ कॅनव्हास आणि प्लास्टिक फॅब्रिक अग्निरोधक मानकांसाठी अनुरुप नाहीत. 5 / 8रिपोर्ट म्हटलं आहे की, पोलिसांना असंही आढळून आलं की निवासी क्षेत्रातील एका इमारतीत लिफ्ट लॉबीच्या खिडक्या सील करण्यासाठी पॉलीयुरेथेन फोमचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे आग वेगाने पसरली. हाच ज्वलनशील पदार्थ यामागचं संभाव्य कारण आहे. 6 / 8पोलिसांनी अटक केलेले तीन व्यक्ती इमारतीच्या नूतनीकरणासाठी हे साहित्य बसवण्याची जबाबदारी असलेल्या बांधकाम कंपनीचे अधिकारी होते. संशयितांमध्ये कंपनीचे दोन संचालक आणि एक प्रकल्प सल्लागार यांचा समावेश आहे ज्यांच्या घोर निष्काळजीपणामुळे मोठी जीवितहानी झाली.7 / 8चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एका निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीबद्दल शोक व्यक्त केला आणि अधिकाऱ्यांना आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यांनी तातडीने बचावकार्य आणि मृतांची संख्या याबद्दल संपूर्ण माहिती मागितली.8 / 8शी यांनी हाँगकाँग आणि मकाओ वर्क ऑफिस आणि सीपीसी सेंट्रल कमिटीच्या संपर्क कार्यालयाला आग विझविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे, शोध आणि बचावकार्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे, जखमींवर उपचार करण्याचे आणि पीडितांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी सरकारला मदत करण्याचे निर्देश दिले, असं शिन्हुआ रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.