By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:44 IST
1 / 7आफ्रिकेतील देश असलेल्या इथियोपियात ज्वालामुखीचा स्फोट झाला. १२ हजार वर्षानंतर हेली गुब्बी ज्वालामुखी जागा झाला. ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्यातून बाहेर पडलेली राखेच ढग भारतापर्यंत आले आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकांची सॅटेलाईटने दृश्य टिपली आहेत.2 / 7रविवारी हेली गुब्बी ज्वालामुखी फुटला. त्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साईड असलेले १५ किमी उंचीचे ढग तयार झाले. हे ही राख येमेन, ओमानपर्यंत पसरले. काही ढग पश्चिम आणि उत्तर भारतापर्यंत पोहोचले आहेत.3 / 7सोमवारी रात्री जवळपास ११ वाजता ज्वालामुखीच्या स्फोटामुळे तयार झालेले ढग इथियोपियापासून ४३०० किमी लांब असलेल्या दिल्ली आणि आजूबाजू्च्या भूप्रदेशावर दिसले. आता राखेचे हे ढग भारतातून कमी झाले असून, हळूहळू चीनकडे सरकत आहेत.4 / 7ज्यावेळी हेली गुब्बी ज्वालामुखीचा स्फोट झाला. त्यावेळी प्रचंड मोठा आवाज झाला आणि जमीन थरथरली. त्यानंतर भलामोठा माती आणि धूराचे लोट बाहेर पडले. हे सगळे सॅटलाईट कॅमेऱ्यांनी टिपले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.5 / 7गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर सल्फर डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आहे. त्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्याबद्दलची चिंता वाढली आहे. येमेन आणि ओमान सरकारने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्यांना श्वास घेण्यास त्रास आहे, त्यांच्यासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.6 / 7हेली गुब्बी अफार खडकाचा भाग आहे. हा असा भाग जिथे पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्स सातत्याने घसरत चालल्या आहेत. याच परिसरात एर्टा एले ज्वालामुखीही आहे, त्याच्यावरही नजर ठेवली जाते. पण, १२००० वर्षांनी हेली गुब्बी ज्वालामुखी फुटल्याने पृथ्वीच्या पोटात कोणते बदल होत चालले आहेत, याबद्दल प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.7 / 7ज्वालामुखी पृथ्वीच्या भूगर्भात जमा झालेला गरम लाव्हा आणि गॅसच्या दबाव वाढल्यामुळे फुटतो. त्यामुळे वितळलेला लाव्हा, धूर आणि राख बाहेर फेकली जाते. जगातील बहुतांश सक्रिय ज्वालामुखी हे प्रशांत महासागराच्या बाजूला असलेल्या रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आहेत. तिथे भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेट्स सातत्याने हलत आणि एकमेकांवर आदळत असतात आणि ज्वालामुखीचा स्फोट होतो.