शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:46 IST

1 / 10
ऑपरेशन सिंदूर काळात तुर्कीने उघडपणे पाकिस्तानची मदत केली होती. तुर्कीने पाकिस्तानला पाठवलेले ड्रोन पाक सैन्याने भारताविरोधात वापरले. परंतु भारतीय लष्कराने तुर्कीचे ड्रोन मोठ्या प्रमाणात हवेतच मारले. इतकेच नाही तर ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर अंकारा येथे पोहचले होते.
2 / 10
शहबाज आणि मुनीर यांनी तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांचे आभार मानले. यावेळी अझरबैझानचे राष्ट्रपतीही तुर्कीला पोहचले होते. आता पाकिस्तान आणि तुर्की यांच्या नापाक जोडीला मात देण्यासाठी भारताला मोठी ऑफर मिळाली आहे. तुर्कीचा सर्वात मोठा शत्रू ग्रीसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारत आणि ग्रीस एकत्रितपणे तुर्की-पाकिस्तानविरोधात एक मजबूत भिंत म्हणून काम करू शकतात असं म्हटलं आहे.
3 / 10
कॅनडा, पोलँड, आर्मेनिया, तुर्कीत काम केलेले ग्रीसमधील वरिष्ठ अधिकारी लिओनीदास क्रायरसथोंपोउलोसने एका मुलाखतीत हे विधान केले. ग्रीस आणि भारत दोन्ही मिळून एर्दोगानविरोधात उभे राहून काम करू शकतात. भारत आणि ग्रीस यांच्या सैन्य मदत विशेषत: एअरफोर्समध्ये सहकार्य वाढवले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.
4 / 10
भारत ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल फायटर जेटच्या कामगिरीबाबत ग्रीसला माहिती देऊ शकतो. हिंद महासागर, भूमध्य सागरात संयुक्त सैन्य अभ्यास करून पाकिस्तान आणि तुर्कीला इशारा दिला जाऊ शकतो असंही लिओनीदास यांनी म्हटलं आहे.
5 / 10
त्याशिवाय ग्रीसने काश्मीर मुद्द्यावर भारताला उघडपणे पाठिंबा द्यावा तर ग्रीसच्या मुद्द्यावर आणि तुर्कीच्या धमकीविरोधात भारताने ग्रीसला पाठिंब्याची भूमिका घ्यावी. संयुक्त राष्ट्र अथवा जागतिक मंचावर भारत आणि ग्रीस यांनी एकमेकांना खुली मदत करावी असं लिओनीदास यांनी सांगितले आहे.
6 / 10
याशिवाय, भारत आणि ग्रीसमध्ये अणु तंत्रज्ञानावर प्रभावी सहकार्य असले पाहिजे जेणेकरून तुर्की आणि पाकिस्तान लष्करी संघर्ष सुरू करण्यापूर्वी दोनदा विचार करतील. नाटो देश तुर्कीने मजबूत शस्त्र उद्योग बनवला आहे, जे तो जगात निर्यात करतो. आफ्रिकेत तुर्कीचा प्रभाव वाढला आहे. लीबिया आणि सूडानमध्ये त्यांचे सैन्य अड्डे आहेत.
7 / 10
तुर्कीत एर्दोगन यांनी विरोधी पक्षाचे नेते आणि इस्तांबुलचे मेयर यांना अटक करून जेलमध्ये टाकले आहे. त्यावर पाश्चिमात्य देशांनी मौन बाळगले आहे. एर्दोगन यांना स्वत:ला मुस्लिम देशांचे नेतृत्व करायचे आहे. एर्दोगन हा खिताब मिळवू शकेल परंतु त्यांचा हेतू यापेक्षाही पुढचा आहे असा दावा ग्रीसने केला.
8 / 10
तुर्कीला ऑट्टोमन साम्राज्याप्रमाणेच शक्ती आणि प्रभाव असावा अशी एर्दोगनची इच्छा आहे. पहिल्या महायुद्धानंतर ऑट्टोमन साम्राज्य कोसळले. ग्रीस सरकारला तुर्कस्तानशी चांगले संबंध हवे आहेत परंतु एर्दोगन अनेक मुद्दे उपस्थित करत आहेत. सागरी सीमा, हवाई क्षेत्र आणि अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून वाद आहे. भारत आणि ग्रीसमधील संबंध सिकंदरच्या काळापासूनचे आहेत असंही त्यांनी आठवण करून दिली.
9 / 10
तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याचे समोर आले. तेव्हापासून भारताने तुर्कीविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली. भारत सरकारने देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी इंडिगोला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
10 / 10
त्याशिवाय भारत-पाकिस्तान हवाई युद्धात पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीवर भारतीयांनी पर्यटन बहिष्कार, कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर