शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगात पाच देशात आहे सर्वात गरिबी, जाणून घ्या त्यांची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 7:48 PM

1 / 6
श्रीमंत देशांबाबत अनेकांना माहिती असते. पण तुम्हाला माहीत आहे का सर्वात गरीब देश कोणता आहे?, जगाच्या नकाशावर कोणता देश आहे जो सर्वात गरीब हेसुद्धा आता समोर आलं आहे. वर्ल्ड बँक आणि गोलकीपर्सच्या रिपोर्टनुसार जगात असे पाच देश आहेत जे सर्वात गरीब आहेत.
2 / 6
सोमालिया हा देश यादीत पहिल्या स्थानी आहे. सोमालिया जगातला सर्वात गरीब देश आहे. गरिबीचा विचार केल्यास त्याचा दर 99.2 टक्के आहे. सोमालियातील 1.50 कोटींहून जास्त लोक गरिबीत झुलत आहेत.
3 / 6
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हा देश यादीत दुसऱ्या स्थानी आहे. या देशात गरिबीचा दर 80.92 टक्के आहे. 46 लाखांहून अधिक लोक गरिबीत जगत आहेत.
4 / 6
बरुंदी (Burundi) हा देश गरिबीच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे. गरिबीचा दर या देशात 77.72% आहे. देशातील 87 लाखांहून अधिक लोक हलाखीत दिवस काढत आहेत.
5 / 6
उत्तर कोरिया हा गरिबीच्या बाबतीत चौथ्या स्थानी आहे. या देशाचा गरिबीचा दर 70.58% आहे. 1.8 कोटींहून अधिक लोक गरिबीत जीवन जगत आहेत.
6 / 6
मडागास्कर देश सर्वात गरीब असून तो यादीत पाचव्या स्थानी आहे. गरिबीचा दर या देशात 69.77% टक्के आहे. इथे 1.83 कोटींहून अधिक लोक गरिबीत होरपळतायत.