शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आईच्या वाढदिवसासाठी इलॉन मस्क यांनी मुंबईत पाठवली खास भेट; मेय यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:25 IST

1 / 7
इलॉन मस्क यांच्या आईचे नाव मे मस्क आहे. मेय मस्क एक प्रसिद्ध मॉडेल आणि पोषणतज्ञ देखील आहेत. मेय सध्या मुंबईत असून त्यांनी त्यांचा ७७ वा वाढदिवस भारतात साजरा केला आहे.
2 / 7
वाढदिवसाच्या खास प्रसंगी, इलॉन यांनी त्यांच्या आईला एक भेट पाठवली. ही भेट मेय यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ती त्यांचा मुलगा इलॉन मस्क यांनी इतक्या दूरवरून पाठवली होती.
3 / 7
मेय यांनी एक्सवर याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी फुलांसह स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. 'इलॉन मस्क, मुंबईत वाढदिवसाची फुले पाठवल्याबद्दल धन्यवाद. ७७ वर्षांचे होणे खूप छान आहे,' असे मेय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
4 / 7
इलॉन मस्क यांनीही त्यांच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'आई, मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद,' असे मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटलं. मेय यांच्या मते, त्या त्यांचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करतात. अॅलन, किम्बल आणि टोस्का मस्क त्यांच्यासाठी पार्टी देतात.
5 / 7
वाढदिवसाच्या आधी मेय मस्क यांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत मुंबईचे आराध्य दैवत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. रविवारी जॅकलिन आणि मेय मस्क या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचल्या होत्या.
6 / 7
जॅकलिनने मेय मस्कसोबत सिद्धिविनायक मंदिराला भेट देण्याचा तिचा अनुभव शेअर केला. 'तो खूप चांगला अनुभव होता. मी माझ्या लाडक्या मैत्रिणी मेय मस्कसोबत गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. त्या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भारतात आहेत. मेय मस्क यांच्या पुस्तकातून मी खूप काही शिकले. मला कळले आहे की वय हे फक्त एक आकडा आहे आणि त्याचा तुमच्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर परिणाम होत नाही, असे जॅकलिनने म्हटलं.
7 / 7
मेय मस्क यांचा जन्म १९४८ मध्ये कॅनडामध्ये झाला आणि त्या गेल्या ५० वर्षांपासून मॉडेलिंग करत आहेत. त्या व्होग, स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड आणि हार्पर्स मार्केट सारख्या अनेक प्रमुख मासिकांच्या फ्रंटपेजवर दिसल्या आहेत. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे पोषण आणि खानपान या विषयात दोन पदव्युत्तर पदवी आहेत. टोरंटो विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले.
टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कMumbaiमुंबई