प्रसिद्ध खेळाडूच्या बाहूपाशात दिसली डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स सून, व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:43 IST
1 / 5अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या राजकीय निर्णयांबरोबरच वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या एक्स सुनेमुळे चर्चेत आहेत. ट्रम्प यांची एक्स सून आणि प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स यांच्यात जवळीक वाढल्याचे दावे केले जात आहेत. 2 / 5स्वत: टायगर वुड्स यानेच याबाबतची कबुली दिली आहे. आपण डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स सून वेनेसा ट्रम्प यांना डेट करत असल्याच्या चर्चांना टायगड वुड्सने सोशल मीडियावरून दुजोरा दिला आहे. याआधीही टायगर वुड्स हा प्रसिद्ध मॉडेल्स, अभिनेत्री यांच्याशी असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिलेला आहे. 3 / 5टायगर वुड्सने वेनेसा ट्र्म्प हिच्यासोबत आराम करत असताना आपले दोन फोटो शेअर केले आहेत. तसेच ‘तुझ्यासोबत हे जीवन खूप सुंदर आहे’, असे त्या फोटोंवर लिहिले आहे. यामधील पहिल्या फोटोमध्ये टायगर वुड्स आणि वेनेसा हे दोघेही उभे आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या बाहूपाशात आहेत. 4 / 5या दोघांमध्ये काही तरी सुरू असल्याची चर्चा काही काळापासून सुरू होती. त्यानंतर आता हे फोटो समोर आले आहेत. वेनेसा ट्रम्प हिने डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर याच्याशी असलेलं नातं तोडताना २०१८ मध्ये घटस्फोट घेतला होता. तिनेही आता तिच्या इन्स्टा अकाउंटवर आपला आणि टायगर वुड्सचा फोटो ठेवला आहे. 5 / 5दरम्यान, टायगर वुड्सचं वैयक्तिक जीवन हे खूपच वादग्रस्त राहिलेलं आहे. २००९ मध्ये उघड झालेल्या सेक्स स्कँडलमध्ये त्याचं गोल्फमधील करिअर उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर त्याची पत्नी एलिस नॉर्डेग्रेन हिने त्याच्या सोबत असलेलं नातंही तोडलं होतं.