1 / 11चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्व देशांसमोर आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंत ४८ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.2 / 11कोरोना विषाणूवर आतापर्यंत कोणतंही ठोस औषध तयार झालं नाही. जगभरातील सर्व संशोधक कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अद्याप लसीचा शोध लागण्यात वेळ जाईल असं सांगण्यात येत आहे3 / 11दरम्यान, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध वापरण्यात येत आहे. या औषधासाठी अमेरिकेने भारतावर दबावदेखील आणण्याचा प्रयत्न केला होता. 4 / 11हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोरोना रुग्णांवर प्रभावी असल्याचं सांगणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सर्वांना आश्चर्यचकित केले, ते स्वत: हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचं सेवन करत असल्याचं सांगितले. 5 / 11ट्रम्प अशावेळी हे औषध घेत आहेत ज्यावेळी सरकारी तज्ञांचा असा दावा आहे की, कोविड १९ रोगाविरूद्ध हे मलेरिया विरोधी औषध प्रभावी ठरु शकत नाही. ट्रम्प यांनी या औषधाबद्दल मोठे दावे केले होते, भारत या औषधाचा मोठा उत्पादक असल्याने भारताकडून ही औषधं आयात केली होती. 6 / 11ट्रम्प म्हणाले की, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र गेल्या दीड आठवड्यापासून खबरदारी म्हणून हे औषधे घेत आहे. मी रोज औषध घेतो. हे औषध जिंकपासून बनविलेले आहे. मला वाटते ते चांगले आहे. मी याबद्दल बर्यापैकी चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत असं ते म्हणाले. 7 / 11राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या प्रमोशनमध्ये उत्सुकता होती. ट्रम्प यांना विचारले की, डॉक्टरांना विचारलं होतं का? यावर ट्रम्प म्हणाले की, डॉक्टरांनी मला विचारले, हायड्रोक्सीक्लोरोक्विन आवडतात का? या प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी डॉक्टरांना हो म्हणून उत्तर दिलं. 8 / 11एमडेज या वैद्यकीय जर्नलमध्ये असं आढळले आहे की कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि टॉसिलीझुमॅब औषधे उपचारासाठी वापरतात. परंतु ही औषधे प्रभावी सिद्ध झाली नसल्याचं तज्ञांनी सांगितले आहे. 9 / 11स्वतः अमेरिकेच्या फूड अॅण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने त्याच्या वापराविरूद्ध चेतावणी दिली होती. तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा औषधाचं सेवन करत आहेत. 10 / 11विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि त्याची विक्री थांबविली होती. त्यानंतर अमेरिकेने भारतावर या औषधासाठी दबाव टाकल्याने औषधांवरील बंदी उठवण्यात आली. 11 / 11सध्या कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या ५५ देशांना भारत मदत आणि व्यावसायिक आधारावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरविण्याच्या तयारीत आहे. न्ययॉर्कमध्ये १५०० रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची चाचणी घेण्यात येत आहे.