शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 7:26 AM

1 / 21
जगात कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास सुरुवात होऊन आता सहा महिन्यांहून अधिकचा काळ लोटत आला आहे. या काळात जगभरात एक कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असून, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापतरी ही साथ नियंत्रणात न आल्याने जगभरात चिंतेचे वातावरण पसरलेले आहेत.
2 / 21
कोरोना संकटाच्या या सहा महिन्यांच्या काळात जगभरातील सामाजिक जीवनापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत मोठे बदल दिसून आले असून, संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या या अतिसुक्ष्म विषाणूला रोखण्यासाठी लस विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कोरोना विषाणूमुळे गेल्या सहा महिन्यांत जगभरातमध्ये झालेल्या उलथापालथीचा हा आढावा
3 / 21
कोरोनाचा संसर्ग नेमका कुठून सुरू झाला याचं स्पष्ट उत्तर अद्याप जगासमोर आलेलं नाही. चीनमधील एका मांसाच्या बाजारातून याच्या संसर्गाची सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्राण्यांपासून माणसाला संसर्ग झाल्याची पहिली घटना कुठली होती याचे गुढ अद्याप कायम आहे.
4 / 21
चीनमध्ये कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाल्यानंतर चिनी संशोधकांनी युद्धपातळीवर शोध घेत कोरोना विषाणूची जनुकीय रचना अगदी कमी वेळेत जगासमोर आणली. २१ जानेवारी रोजी ही माहिती त्यांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर तीन दिवसांनी कोरोनाबाबत सविस्तर माहितीही त्यांनी दिली. त्याच माहितीच्या आाधारावर कोरोनाविरोधात लस विकसित करण्याचे काम जगभरात सुरू झाले.
5 / 21
सार्स कोव्ह-२ विषाणूच्या बाह्य आवरणावर एस-२ नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन मानवी शरीरातील उतींना जोडले जाते. त्यामुळे संसर्ग होऊन संबंधित व्यक्ती आजारी पडते. आता संशोधन सुरू असलेली कोरोनावरील लस या प्रथिनांना नष्ट करण्याचे वा ब्लॉक करण्याचे काम करेल.
6 / 21
कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर सुरुवातीच्या काळात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा संसर्ग असलेल्या पृष्ठभागावर स्पर्श झाल्याने कोरोनाची लागण होते, असे सांगण्यात आले होते. मात्र आता तापाच्या विषाणूप्रमाणेच कोरोनासुद्धा हवेतून फैलावू शकतो, असे समोर आले आहे. विशेषकरून जिथे एसीचा वापर होतो, अशा ठिकाणी कोरोना फैलाव होऊ शकतो.
7 / 21
कुठल्याही बंदिस्त जागी मोठ्या प्रमाणात असलेली लोकांची उपस्थिती कोरोनाच्या फैलावासाठी अनुकूल ठरू शकते. त्यामुळेच जगातील जवळपास सर्वच देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला होता. अजूनही बऱ्याच देशांमध्ये चित्रपटगृहे, मेळावे आणि इतर मोठे कार्यक्रम यांचे आयोजन बंद आहे.
8 / 21
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्कच्या वापराबाबत अनुकूल मत व्यक्त केले नव्हते. मात्र अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटनेचे मत झुगारून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्य केले होते. मात्र असे असले तरी अनेक ठिकाणी लोक मास्कचा योग्य वापर करत नसल्याचे समोर आले आहे.
9 / 21
कोरोना विषाणूवर अद्याप कुठलेही खात्रीशीर औषध निघालेले नाही. त्यामुळे आधीच घेतलेली खबरदारी हा या आजारापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे. कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंग आणि चागल्या प्रकारे हात धुणे हेच मार्ग आहेत. मात्र जसजशी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसतशी सोशल डिस्टंसिंगबाबतचे गांभीर्यही कमी होत चालले आहे.
10 / 21
तुमच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यापासून माणसांना कुठलाही धोका नसल्याचे आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आले आहे. मात्र या दिशेने अजून संशोधन सुरू आहे.
11 / 21
कोरोनाचा विषाणू बाधित व्यक्तीच्या फुप्फूसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने रुग्णाच्या फुप्फुसावर अधिक लक्ष दिले जात असे. मात्र आथा आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर रुग्णाच्या फुप्फुसासोबतच इतर अवयवांचीही तपासणी केली जात आहे. कारण काही रुग्णांमध्ये कोरोना हा फुप्फुसासोबतच शरीरातील इतर अवयवांवरही हल्ला करत असल्याचे दिसून आले आहे.
12 / 21
तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास तुम्ही कोरोनाच्या गंभीर संसर्गापासून स्वत:चा बचाव करू शकता, असे संशोधनामधून समोर आलेले आहे. त्यामुळेच सध्या बाजारामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा दावा करणारी विविध औषधे येत आहेत. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी चांगल्या रोगप्रतिकारशक्तीची मोठी गरज आहे.
13 / 21
कोरोना विषाणूच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात या विषाणूविरोधात लढणऱ्या अँटिबॉडी विकसित होत असल्याचे समोर आले आहे. काही देशांमध्ये बऱ्या झालेल्या रुग्णाँकडून या अँटीबॉडी घेऊन त्यांचा वापर इतर बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी केला जात आहे. मात्र सध्यातरी अँटीबॉडी दान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे.
14 / 21
जेव्हा युरोपमध्ये कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाली तेव्हा डॉक्टरांकडून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक वापर केला गेला. मात्र कोरोनाबाधितांवरील उपचारांमध्ये व्हेंटिलेटरचा वापर हा फायद्यापेक्षा नुकसानकारकच अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता आयसीयूमध्ये उपचार करताना व्हेंटिलेटरपेक्षा रुग्णांना अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे.
15 / 21
कोरोनाचा विषाणू बाधित व्यक्तीच्या फुप्फूसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने रुग्णाच्या फुप्फुसावर अधिक लक्ष दिले जात असे. मात्र आथा आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर रुग्णाच्या फुप्फुसासोबतच इतर अवयवांचीही तपासणी केली जात आहे. कारण काही रुग्णांमध्ये कोरोना हा फुप्फुसासोबतच शरीरातील इतर अवयवांवरही हल्ला करत असल्याचे दिसून आले आहे.
16 / 21
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम मुत्रपिंडांवर झाल्यास डायलिसीसचीसुद्धा गरज भासते. मात्र सद्यस्थितीत डायलिसिस करून घेण्यासाठीसुद्धा खूप धावपळ करावी लागत आहे.
17 / 21
कोरोना विषाणूला रोखणारा रामबाण उपाय अद्यापतरी संशोधकांना सापडलेला नाही. मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर काही औषधांचा वापर करत आहेत. मात्र ही औषधे केवळ कोरोनाच्या लक्षणांवर इलाज करतात. मूळ आजारावर त्याचा उपयोग होत नाही. यामध्ये सध्या रेमडेसिव्हीर हे औषध वापरले जात आहे.
18 / 21
संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणाऱ्या कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी सध्या युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. काही ठिकाणी कोरोनावरील लस चाचणीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे या वर्षाअखेरीपर्यंत कोरोनावरील लस बाजारात येईल, असे काही जणांचे मत आहे. तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावरील लस बाजारात येईल असे, काही जणांना वाटते. मात्र कुठलीही लस ही एवढ्या लवकर तयार होऊ शकत नाही. तसेच तशी लस तयार झाली तर सर्व लोकांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.
19 / 21
सद्यस्थितीत विविध देशांमध्ये कोरोनावरील १६० लसींच्या निर्मितीचे काम सुरू आहे. तसेच टीबीवर उपचार म्हणन वापरण्यात येणाऱ्या लसीमध्येही काही बदल करून ती कोरोनाविरोधात वापरण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्नही सुरू आहे. भारतामध्येही सीरम इंस्टिट्युने कोरोनाविरोधातील लसीच्या निर्मितीची तयारी पूर्ण केली आहे. आता त्यांना केवळ या लसीसाठीच्या योग्य फॉर्म्युल्याची प्रतीक्षा आहे.
20 / 21
जून महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील पाच लसींची मानवी चाचणी झाली आहे. कुठलीही लस बाजारात आणण्यापूर्वी त्याची मानवी चाचणी घेतली जाते. त्या माध्यमातून या लसीचा माणसांवर काही विपरित परिणाम तर होत नाही आहे ना याचा शोध घेतला जातो. मात्र असा परिणाम दिसून येण्यासाठी बराच काळ लागू शकतो.
21 / 21
जेव्हा कुठल्याही समाजातील बहुतांश लोकांना एखाद्या आजाराची लागण झाली की, त्या आजाराशी लढण्याची प्रतिकारशक्ती संबंधित लोकसंख्येमध्ये विकसित होते. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. जून महिन्यापर्यंत जगातील एक कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र ७.८ अब्ज लोकसंख्या असलेल्या या जगात हर्ड इम्युनिटी विकसित होण्यासाठी एवढी संख्या पुरेशी नाही. त्यामुळे कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी विकसित होणे सध्यातरी कठीणच दिसत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय