शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: कोरोना रुग्णांना उपाशी ठेवतोय 'हा' देश; गुप्त विलगीकरणात अनेकांचा मृत्यू

By कुणाल गवाणकर | Published: November 03, 2020 4:49 PM

1 / 9
जगातील कोरोना रुग्णांचा आकडा पावणे पाच कोटी लाखांच्या जवळ पोहोचला आहे. तर मृतांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे.
2 / 9
चीनमधून पसरलेल्या कोरोनानं आधी युरोप, अमेरिकेनंतर भारतात धुमाकूळ घातला. भारतात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या चार आठवड्यांपासून लक्षणीय घट झाली आहे.
3 / 9
भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे ब्रिटनसह काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
4 / 9
चीनचा शेजारी असलेल्या उत्तर कोरियानं मात्र कोरोनाचा सामना करताना धक्कादायक गोष्टी केल्या आहेत. कोरोनाचा फैलाव झालाच नसल्याचा दावा करणाऱ्या उत्तर कोरियाची गुपितं आता उघड होऊ लागली आहेत.
5 / 9
उत्तर कोरिया कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांना उपाशी ठेवून त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याचं वृत्त साऊन चायना मॉर्निंग पोस्टनं दिलं आहे.
6 / 9
उत्तर कोरियानं चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागात विलगीकरण केंद्रं तयार केल्याची माहिती दक्षिण कोरियात काम करणारे ख्रिस्ती कार्यकर्ते टिम पीटर्स यांनी दिली आहे.
7 / 9
आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना कोणतेही वैद्यकीय उपचार दिले जात नाहीत. त्यांना जेवण देताना कुटुंबीयांनादेखील अडथळे येतात, अशी माहिती पीटर्स यांनी दिली.
8 / 9
उत्तर कोरियातील कोरोना रुग्णांची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यांना सरकारकडून अतिशय अपुरं अन्न आणि औषधोपचार मिळतात. कित्येकांना तर तेही मिळत नाहीत, असं पीटर्स यांनी सांगितलं.
9 / 9
विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या कित्येक जणांचा मृत्यू झाल्याचा दावादेखील पीटर्स यांनी केला. उत्तर कोरियातल्या ४० टक्के लोकसंख्येला पुरेसं अन्न मिळत नसल्याचा संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या