शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 21 टक्के घट; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 7:58 PM

1 / 10
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 52 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 526,034,283 वर पोहोचली आहे. तर 6,297,367 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला.
2 / 10
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. लाखो लोकांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. काही देशांत मात्र अद्यापही गंभीर परिस्थिती पाहायला मिळत असून रुग्णसंख्या वाढत आहे.
3 / 10
जगभरातील सर्वच देश कोरोनाचा महाभयंकर संकटाचा सामना करत असताना आता मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत दिलासादायक माहिती दिली आहे.
4 / 10
गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 21 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर जगातील बहुतांश भागात प्रकरणे वाढली आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.
5 / 10
युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने जाहीर केलेल्या साथीच्या रोगावरील आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे की मार्चच्या अखेरीस कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये घट झाली होती, परंतु आता प्रकरणे स्थिर झाल्याचे दिसत आहेत.
6 / 10
डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि पश्चिम पॅसिफिकमध्ये प्रकरणे वाढली आहेत, तर युरोप आणि आग्नेय आशियामध्ये कमी होत आहेत. सुमारे नऊ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
7 / 10
पश्चिम आशियामध्ये संसर्गाची प्रकरणे 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहेत, तर आफ्रिका वगळता सर्वत्र संसर्गामुळे मृत्यूची प्रकरणे कमी झाली आहेत. आफ्रिकेत मृत्यूची प्रकरणे जवळपास 50 टक्क्यांनी वाढली आहेत.
8 / 10
WHO च्या COVID-19 च्या आकडेवारीमध्ये उत्तर कोरियाच्या आकडेवारीचा समावेश नाही, जिथे अलीकडेच साथीचा रोग पसरला आहे. देशाने अद्याप आरोग्य संस्थेला आकडेवारीची माहिती दिलेली नाही.
9 / 10
उत्तर कोरियामध्ये गुरुवारी 2.62 लाखांहून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण प्रकरणे 20 लाखांवर पोहोचली आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की ते उत्तर कोरियामध्ये कोरोनाच्या प्रसारामुळे खूप चिंतेत आहेत
10 / 10
WHO ने सांगितले की या प्रदेशात चीनमधून सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जिथे 94 टक्के वाढ झाली आहे किंवा 3.89 लाख नवीन प्रकरणे आढळली आहेत. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना