शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 12:01 PM

1 / 12
संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल एक कोटीच्या वर गेली आहे. कोरोनाने अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 12
जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.
3 / 12
अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
4 / 12
जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
5 / 12
अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे.
6 / 12
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील कोरोना तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फॉसी यांनी गंभीर इशारा दिला आहे.
7 / 12
अमेरिकेतील लोक सुधारले नाहीत तर कोरोना व्हायरसचा आणखी कहर पाहायला मिळेल. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अमेरिका अपयशी ठरलं आहे आणि त्यावर मात कशी करावी एक प्रश्न असल्याचं आहे.
8 / 12
फॉसी यांनी जर लोक मास्क घालून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अमेरिकेत दररोज 1 लाख नवीन रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
9 / 12
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्टीव्ह डिसिसीजच्या हेड फॉसी यांनी असा इशारा दिला आहे की अमेरिकेत पुन्हा गोष्टी बिघडत चालल्या आहेत आणि जर लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
10 / 12
लोकांना मास्क घालावे लागतील आणि सोशल डिस्टंन्सिंगचे सक्तीने पालन करावे लागेल. खबरदारी घेतली गेली नाही तर येत्या काळात अमेरिकेत दररोज एक लाखांहून अधिक केसेस येतील यात शंका नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
11 / 12
पुढील वर्षीपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी त्यांना आशा आहे. मात्र त्याआधी बरीच आपत्ती उद्भवू शकते. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीनंतर आता कॅलिफोर्निया, टेक्सास आणि अॅरिझोना ही संक्रमणाची नवीन केंद्रे म्हणून उदयास आली आहेत.
12 / 12
अमेरिकेत परिस्थिती अशीच राहिली तर एक अतिशय वाईट काळ येईल. दररोज 40 हजारांहून अधिक संसर्ग होण्याचे प्रकार घडत आहेत, जर हे असेच राहिले तर दिवसात ते 1 लाखांपर्यंत वाढू शकतात असं फॉसी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDeathमृत्यूdoctorडॉक्टर