CoronaVirus Live Updates : Corona चा प्रसार नेमका कुठे आणि कसा झाला?; WHOचा रिपोर्ट येण्याआधीच चीनने दिली सफाई, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:36 AM2021-03-27T08:36:45+5:302021-03-27T08:54:34+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा नेमका प्रसार कुठून आणि कसा झाला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम काही दिवसांपूर्वी चीनमध्ये दाखल झाली आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 12 कोटींवर पोहोचली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्य़ासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी चाचण्यांना देखील यश आलं आहे. जगभरातील सर्वच देश हे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. पुन्हा एकदा कठोर नियम हे लागू करण्यात येत आहे.

काही देशांमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि प्रसार झाला असं म्हटलं जातं.

कोरोनाचा नेमका प्रसार कुठून आणि कसा झाला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम काही दिवसांपूर्वी चीनमध्ये दाखल झाली आहे. ते विविध पद्धतीने याचा शोध घेत असून संशोधन सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या वुहानमध्ये पाहणी केली. संघटनेने आतापर्यंत याबाबतचा आपला अहवाल अद्याप सादर केलेला नाही. मात्र आता चीनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसच्या उत्पत्ती संबंधीत जागतिक आरोग्य संघटनेचा बहुप्रतिक्षित रिपोर्ट जारी होण्याआधीच शुक्रवारी बीजिंगच्या होणाऱ्या होणाऱ्या संशोधनाबाबच माहिती दिली आहे.

चीनच्या वुहानमध्ये 2019 च्या शेवटी कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा पहिला रुग्ण समोर आला होता. आज कोरोनाने संपर्ण जगाला विळखा घातला असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत.

अमेरिका आणि इतर देशांनी चीनच्या प्रभाव आणि तपासणीच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर वैज्ञानिक संशोधनाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप कम्युनिस्ट देशाने केला आहे.

WHO चा रिपोर्ट येण्याआधीच चीनने स्पष्टीकरण देऊन सफाई देण्याचा प्रयत्न केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांग ताओ म्हणाले, 'आमचं उद्दीष्ट पारदर्शकता दर्शविणे आहे. चीनने कोरोनाविरुद्ध पारदर्शक पद्धतीने लढा दिला आहे आणि काहीही लपवले नाही.'

WHO च्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमनं चीनच्या वुहानचा दौरा केला होता. चीनच्या वुहानमध्येच 2019 च्या शेवटी कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. यावर टीमचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे.

चीनमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण हे आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र उपाययोजना या केल्या जात आहेत. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना अँटीबॉडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने त्याबाबत माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडी विकसित झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

सौम्या स्वामीनाथन यांनी अत्यंत उच्च घनता असलेल्या शहरी वस्तींमध्येही लोकसंख्येच्या 50 ते 60 टक्के लोकांना व्हायरसची लागण झाली आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाली आहे असं म्हटलं आहे.

"सध्या मंजूर झालेल्या लसी या गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूपासून संरक्षण देतात. सौम्य आजार आणि करोना विषाणूच्या संसर्गाशी संबंधित लसांच्या परिणामकारकतेचा अद्याप अभ्यास केला जात आहे" अशी माहिती सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे.