शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : वैज्ञानिक तयार करतायेत असा मास्क, जो कोरोना व्हायरसच्या संपर्कात येताच बदलेल रंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 4:07 PM

1 / 10
कोरोना व्हायरस आणि त्यापासूनची सुरक्षितता, या पार्श्वभूमीवर काही वैज्ञानिक आता कोरोना व्हायरसची ओळख व्हावी यासाठी, एक विशेष प्रकारचा मास्क तयार करत आहेत. वैज्ञानिकांनी यापूर्वीही झिका आणि ईबोला व्हायरससाठी, अशा प्रकारचे मास्क तयार केले होते. या व्हायरसच्या संपर्कात येताच, हे मास्क सिग्नल देत होते.
2 / 10
वैज्ञानिक तयार करत असलेला हा मास्क कोरोना व्हायरसशी संपर्क येताच रंग बदलेल आणि सिग्नल देईल. या मास्कमध्ये, अशा सेंसर्सचा वापर केला जाईल, जे कोरोना व्हायरसच्या संपर्कात येताच कोरोना संक्रमणासंदर्भात संबंधित व्यक्तीला माहिती देईल.
3 / 10
मसाच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी 2014मध्ये, अशा प्रकारचा मास्क तयार केला होता. तो मास्क झिका (झिका) आणि ईबोला (ईबोला) व्हायरसच्या संपर्कात येताच सिग्नल देत होता.
4 / 10
आता याच संस्थांमधील वैज्ञानिक कोरोना व्हायरससाठी, अशा पद्धतीच्या मास्कची निर्मिती करत आहेत. जो मास्क व्हायरसच्या संपर्कात येताच रंग बदलू लागेल. हा मास्क व्हायरसच्या संपर्कात येताच ग्लो म्हणजे चमकदार होईल.
5 / 10
यासंदर्भात माहिती देताना वैज्ञानिक जिम कॉलिंस म्हणाले, या मास्कसमोर जर एखाद्या कोरोनाबाधिताने श्वास घेतला, तो शिंकला अथवा खोकलला, तर हा मास्क तत्काळ फ्लूरोसेन्ट रंगाचा हईल. म्हणजेच चमकदार होईल. जर हे तत्रज्ञान यशस्वी झाले, तर इतर प्रकारच्या स्क्रीनिंग तत्रज्ञानालाही मात देईल.
6 / 10
कॉलिंस म्हणाले, आपण एअरपोर्टवर जाता, प्लेनने सफर करण्यासाठी. मात्र, त्यापूर्वी अनेकप्रकारच्या तपासण्या होता. या तपासण्याच ठरवतात, की आपण प्लेनमध्ये जाऊ शकता अथवा नाही. हेदेखील तसेच आहे.
7 / 10
जिम कॉलिंस यांनी सांगितले, सध्या हा प्रोजेक्ट फार प्राथमिक अवस्थेत आहे. या मास्कच्या पृष्ठभागावर कोरोना व्हायरसबाधित व्यक्तीचा खोकला, शिंक अथवा थुंकीचे थेंब पडले, की तो रंग बदलायला लागेल.
8 / 10
जिम म्हणाले, पुढील काही दिवसांतच आम्ही या मास्कचे ट्रायल करू. यश मिळण्याची पूर्ण आशा आहे. यावेळी आम्ही, या मास्कमध्ये पेपर बेस्ड डायग्नोस्टिक ऐवजी, प्लास्टिक, क्वार्ट्झ आणि कपड्याचा वापर करत आहोत.
9 / 10
या मास्कमध्ये कोरोना व्हायरसचा डीएनए आणि आरएनए असेल. हे तत्काळ मास्कमधील लायोफिलाइझरसोबत एकत्र येऊन रंग बदलेले. हे मास्क अनेक महिने रूमच्या तापमानात सुरक्षित ठेवले जाऊ शकते. तसेच हे अनेक महिने वापरलेही जाऊ शकते.
10 / 10
मास्कमधील लायोफिलायझर ओले होताच, म्हणजे थुंकीचे थेंब, म्यूकस, लाळ अथवा व्हायरसचे जेनेटिक सिक्वेंस मास्कच्या संपर्कात येताच तो रंग बदलायला लागेल. हा मास्क एक ते तीन तासांच्या आत फ्लूरोसेंट रंगाचा होईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEbolaइबोलाZika Virusझिका वायरसscienceविज्ञानdoctorडॉक्टर