शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 12:11 PM

1 / 12
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 12
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका, इटली, स्पेन या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे.
3 / 12
कोरोनामुळे आतापर्यंत 329,735 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 50 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
4 / 12
जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 5,090,118 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 2,024,286 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
5 / 12
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
6 / 12
देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे.
7 / 12
जगात तब्बल 20 लाख लोकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. 2,024,334 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
8 / 12
जगभरात आतापर्यंत 2,024,334 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
9 / 12
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्याही एक लाखांहून हून अधिक झाली असून आतापर्यंत 3400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
10 / 12
देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 1 लाख 12 हजार 359 वर पोहचली आहे. यामध्ये 63 हजार 624 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 3 हजार 435 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
11 / 12
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
12 / 12
कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतhospitalहॉस्पिटलAmericaअमेरिका